सौरऊर्जेवर उजळतात भटक्यांच्या राहुट्या

By admin | Published: August 25, 2015 02:06 AM2015-08-25T02:06:28+5:302015-08-25T02:06:28+5:30

बुलडाणा मलकापूर मार्गावर भटकंती करणा-या लोकांनी घेतला सौर ऊज्रेचा आधार.

The rooftops roam on solar power | सौरऊर्जेवर उजळतात भटक्यांच्या राहुट्या

सौरऊर्जेवर उजळतात भटक्यांच्या राहुट्या

Next

नीलेश शहाकार / बुलडाणा : विजेच्या वाढत्या तुटवड्यामुळे अपारंपरिक असलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्यासाठी शासन प्रचार व प्रसार करीत आहे; मात्र चांगल्या सुखवस्तु घरातही सौर ऊर्जेचा वापर होताना दिसत नाही. या पृष्ठभूमीवर भटकंती करून शहरात काही भटक्यांनी आपल्या कृतीतून सर्वांंंसमोर आदर्श ठेवला आहे. हातावर पोट असलेल्या या भटक्यांच्या राहुट्या सध्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून चकाकल्या आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी दर कोस दर मुक्काम करत बुलडाणा शहरात काही कुटुंबे रोजगारासाठी दाखल झाली आहेत. त्यांना अवगत असणारे ज्ञान आणि जडीबुटी व वनौषधाच्या विक्रीचा पारंपरिक व्यवसाय त्यांनी शहरातील विविध रस्त्यावर थाटला आहे. मलकापूर मार्गावर मागील आठ-दहा दिवसांपासून याच पाच कुटुंब पाल वजा राहुट्या तयार करुन आपल्या कुटुंबासह राहत आहेत. रोजगार मिळेल व पोटाचा प्रश्न सुटेल, या हेतूनेच ही कुटुंबे राहत असली तरी त्यांनी आपल्या झोपड्यांमध्ये अपारंपरिक असलेल्या सौर ऊर्जेचा वापर करीत राहूट्यानजिक चार सौर पॅनल बसविले आहे. यातून मिळणार्‍या सौर ऊर्जेद्वारे या गरीब भटक्यांच्या एका झोपडीत विजेचे दोन बल्ब प्रकाशित होतात. तर दिवसभर टीव्ही व पंखा चालत आहे. विजेची बचत करण्यासाठी सौरऊर्जा स्वयंपूर्ण गाव संकल्पना, सौर कृषीपंप आणि शासकीय इमारतीवर सौरपॅनल बसविण्याच्या उपाययोजना शासकीय स्तरावर सुरु आहेत.
सदैव फिरस्तीवर राहणार्‍या गरिबांनी कुठलेही शासकीय अनुदान न घेता सौर ऊज्रेची धरलेली कास इतरांना लाजिरवाणी करणारी बाब आहे.

*बचतीतून घेतले सौरपॅनल
नेहमी भटकंती करावी लागत असल्यामुळे या लोकांच्या झोपड्यांना वीजपुरवठा मिळत नाही.त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून आपल्या मिळकतीतून पै-पै जमवून या लोकांनी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे चार सौरपॅनल घेतले आहे. सौर ऊर्जा पॅनलवर १२ व्होल्टच्या दोन बॅटर्‍या चार्ज केल्या जातात. या आधारे झोपडीतील लाईट, पंखा, टीव्ही चालविले जाते.

Web Title: The rooftops roam on solar power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.