आरोग्य सुविधेसाठी १२५ कोटी रुपयांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:07+5:302021-05-05T04:57:07+5:30
मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले होते. या उपजिल्हा रुग्णालयात बांधकाम, यंत्रसामग्री, उपकरणे, ...
मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले होते. या उपजिल्हा रुग्णालयात बांधकाम, यंत्रसामग्री, उपकरणे, मनुष्यबळ आदी कामांसाठी ६५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. आ. संजय रायमुलकर यांचा या निधीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. बुलडाणा येथे कार्डियाक कॅथ लॅबकरिता १२ कोटी व कर्करोगासाठी रेडिओ थेरपी युनिटकरिता १२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार आहे. या युनिटसाठी आ. संजय गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. यासोबतच देऊळगाव राजा येथील रुग्णालय ३० खाटांवरून ५० खाटांचे करण्यात येऊन त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहे. याकरिता माजी आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. तर मेहकर तालुक्यातील खंडाळा, चिखली तालुक्यातील डोंगरगाव व संग्रामपूर तालुक्यातील सगोडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी १५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.