शेतक-याला दोन लाखांची नुकसानभरपाई

By admin | Published: August 28, 2015 12:17 AM2015-08-28T00:17:43+5:302015-08-28T00:17:43+5:30

शॉर्टसर्किटने उसाला आग लागली होती; त्यामुळे दोन लाखांची नुकसानभरपाई देण्याचे महावितरण कंपनीला ग्राहक न्यायालयाचे आदेश.

Rs 2 lakh compensation to the farmer | शेतक-याला दोन लाखांची नुकसानभरपाई

शेतक-याला दोन लाखांची नुकसानभरपाई

Next

बुलडाणा : महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील लोंबकळलेल्या तारांचे घर्षण झाल्याने उसाला आग लागून शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोटी-धानोरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांना २ लाख २२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने बुधवार, २६ ऑगस्ट रोजी दिला. धानोरा तालुक्यातील नांदुरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांचे रसूलपूर शिवारात शेत आहे. या शेतात विक्रम पाटील यांनी ऊस लावला होता. त्यांच्या शेतात असलेल्या विद्युत डीबीच्या विजेच्या तारा लोंबकळत होत्या. यातील काही तारा उघड्या अवस्थेत होत्या. सदर डीबीला कुलूपसुद्धा लावलेले नव्हते. १७ मार्च २0१२ रोजी या उघड्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिगणी उडाली व उसाला आग लागला. यामध्ये विक्रम पाटील यांच्या साडेसात एकर शेतातील पीक जळून नष्ट झाले. या घटनेची तक्रार शेतकर्‍यांनी महावितरणला तसेच मलकापूर पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला; मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. याप्रकरणी सदर शेतकर्‍याने सबळ पुराव्यासह जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागितली. अर्जदाराचा युक्तिवाद व दाखल केलेल्या सबळ पुराव्यावरून ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष विश्‍वनाथ ढवळे, सदस्य नंदा लारोकार, एम.बी. वानखेडे यांनी शे तकर्‍याच्या ऊस पिकाच्या नुकसानभरपाईपोटी २ लाख १0 हजार रुपये, त्यावर रक्कम देईपर्यंत नऊ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल सात हजार रुपये आणि कोर्ट खर्चापोटी पाच हजार रुपये असा २ लाख २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. शेतकरी विक्रम पाटील यांच्यातर्फे अँड. शरद राखोंडे यांनी काम पाहिले.

Web Title: Rs 2 lakh compensation to the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.