दुचाकीच्या डिक्कीतील साडेचार लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:34+5:302021-09-22T04:38:34+5:30
तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक लामखेडे (६२) हे १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास चिखली येथील ...
तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक लामखेडे (६२) हे १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास चिखली येथील भारतीय स्टेट बँकेत आले होते. स्टेट बँकेतून त्यांनी साडेचार लाख रुपये काढले आणि स्कूटीच्या (क्र. एम.एच. २८ एक्यू १२९१) डिक्कीत रूमालामध्ये ठेवले. तिथून ते शिवाजी शाळेजवळील शिवाजी हांडगे यांच्या आरओच्या दुकानावर आले. त्यानंतर तिथून वारे पेट्रोलपंपाजवळील रूद्रकर यांच्या इस्त्रीच्या दुकानावर गेले होते. त्यानंतर सावरगाव डुकरे येथे आपल्या घरी निघून गेले. घरासमोर गाडी उभी केली व पैसे घेण्यासाठी डिक्की उघडली असता डिक्कीतील साडेचार लाख रुपये गायब होते. त्यांनी घडलेली घटना मुलगा व पत्नीला सांगितली. मुलगा उमेशसह ते पुन्हा चिखलीला आले. जेथे जेथे गेले, तेथे चौकशी केली. परंतु काहीच सुगावा लागला नाही. अखेर लामखेडे यांनी चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.