४५ हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:05+5:302021-04-07T04:35:05+5:30
जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे साखर विक्रीमधून मिळालेल्या पैशांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार करण्याच्या आदेशानुसार कर्मचारी छोटीराम मुंगळाजी शिपे यांच्या येथील स्टेट ...
जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे साखर विक्रीमधून मिळालेल्या पैशांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार करण्याच्या आदेशानुसार कर्मचारी छोटीराम मुंगळाजी शिपे यांच्या येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या खात्यामध्ये शेवटचा हप्ता जमा झाला होता. या कर्मचाऱ्याने ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बँक चालू झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये आलेली रक्कम ४५ हजार रुपये बँक खात्यातून काढले. त्यानंतर काउंटरच्या बाजूला बसून ही रक्कम मोजली. शेजारी असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेमध्ये गेल्यानंतर खिशामध्ये पैसे पाहिले असता पैसे मिळून आले नाहीत. स्टेट बँक आणि बुलडाणा अर्बन बँकेचे दोन्हीमधील अंतर चाळीस - पन्नास फुटांचे आहे. बँकेमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याकरिता बँक अधिकाऱ्यांना विनंती केली असता, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांशिवाय कोणाला दाखवणार नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.