जिल्हामार्ग विकास व मजबुतीकरणासाठी ८० लाख रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:16+5:302021-04-10T04:34:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हामार्ग विकास व मजबुतीकरणासाठी चिखली मतदारसंघातील पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हामार्ग विकास व मजबुतीकरणासाठी चिखली मतदारसंघातील पाच रस्त्यांसाठी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यानुषंगाने माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
चिखली मतदारसंघातील रायपूर, केसापूर, बोधेगाव, चांडोळ, हिवरा नाईक, धोत्रा नाईक, साकेगाव, चांधई, गोदरी, अंत्रीकोळी या गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार बोंद्रे यांनी जि.प. अध्यक्षा व बांधकाम सभापतींकडे पाठपुरावा केल्याने पाच रस्त्यांसाठी सुमारे ८० लक्ष रुपयांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून मंजूर झाला आहे. यामध्ये रायपूर ते केसापूर रस्ता सुधारणा करणे १८ लाख, बोधेगाव ते चांडोळ रस्ता सुधारणा करणे १५ लाख, हिवरा नाईक ते धोत्रा नाईक रस्ता सुधारणा करणे १५ लाख, एमएच २२८ ते चांधई, गोदरी, अंत्रीकोळीपासून बुलडाणा तालुका सरहद्दपर्यंत रस्ता सुधारणा करणे २० लाख तसेच साकेगाव जोड रस्ता सुधारणा करणे १० लाख रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला असल्याने राहुल बोंद्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
..............................