आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस ११ जूनपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:25+5:302021-06-10T04:23:25+5:30

बुलडाणा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ नुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ ...

RTE admission process starts from 11th June | आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस ११ जूनपासून प्रारंभ

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस ११ जूनपासून प्रारंभ

Next

बुलडाणा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ नुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गंत ७ एप्रिलला राज्यस्तरावरून लाॅटरी काढण्यात आली हाेती़ या लाॅटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू हाेणार आहे़

ज्या विद्यार्थ्यांची आरटीई २५ टक्के काेट्यामध्ये निवड झाली आहे त्या मुलांच्या पालकांनी ११ जून २०२१ पासून, संबंधित शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्‍चित करावा. प्रवेशासाठी पालकांनी जन्मतारीख, जातप्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी पुरावा, आधार आदीबाबतची मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात. शाळेमध्ये कागदपत्र पडताळणीकरीता पालकांनी एकाच वेळी न जाता, ज्या पालकांना शाळेकडून मेसेज प्राप्त होईल त्याच पालकांनी शाळेत जावे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात़ पालकांना प्रवेशासाठी २० दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. याची नोंद जिल्ह्यातील शाळा व पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे़

१८७९ बालकांची झाली निवड

आरटीईअंतर्गंत बुलडाणा जिल्ह्यातील २३१ शाळांनी नाेंदणी केली हाेती तसेच २१४२ जागांसाठी ३४४५ अर्ज आले हाेते़ राज्यस्तरावर ७ एप्रिलला काढण्यात आलेल्या लाॅटरीमध्ये १८७९ बालकांची निवड करण्यात आली आहे़ काेराेनामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली हाेती़ आता काेराेना रुग्णांमध्ये घट झाल्याने ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू हाेणार आहे़

Web Title: RTE admission process starts from 11th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.