तीन टिप्परला आरटीओ विभागाने केला १ लाख ९३ हजार रुपये दंड! मॉन्टे कार्लो कंपनीची वाहने पोलिसांनी केली होती स्थानबद्ध 

By अनिल गवई | Published: October 28, 2022 12:05 AM2022-10-28T00:05:06+5:302022-10-28T00:06:10+5:30

Crime News: क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक कोटी ९३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. खामगाव शहर पोलिसांनी वाहने स्थानबद्ध केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले.

RTO department fined 1 lakh 93 thousand rupees to three tippers! The Monte Carlo company vehicles were located by the police | तीन टिप्परला आरटीओ विभागाने केला १ लाख ९३ हजार रुपये दंड! मॉन्टे कार्लो कंपनीची वाहने पोलिसांनी केली होती स्थानबद्ध 

तीन टिप्परला आरटीओ विभागाने केला १ लाख ९३ हजार रुपये दंड! मॉन्टे कार्लो कंपनीची वाहने पोलिसांनी केली होती स्थानबद्ध 

googlenewsNext

- अनिल गवई
खामगाव -  क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक कोटी ९३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. खामगाव शहर पोलिसांनी वाहने स्थानबद्ध केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी रात्री तातडीने ही कारवाई केली. या कारवाई सुरू असताना  एका विना क्रमांकाच्या कारला देखील दहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठेवण्यात आला.

मॉन्ट कार्लो या रस्ते विकासक कंपनीला खामगाव तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या विस्तारी करणआचा कंत्राट देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, मालवाहतूक करणाऱ्या चालकाकडे लायसन नसणे आणि वाहनाच्या मूळ संरचनेत बदल केल्या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तीन वाहने स्थानबद्ध केली होती. या वाहनांवर शहर पोलिसांनी दंड ठेवल्यानंतर गुरुवारी रात्री उप प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहनांची तपासणी केली. या तपासणीत क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिज आढळून आल्याने उप प्रादेशिक परिवहन विभागाने तीनही वाहनांना एक एक लक्ष 93 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तर ही कारवाई सुरू असताना मोंटे काल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विना नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर तसेच वाहन चालकाकडे परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीच्या चौथ्याही वाहनाला दंड लावण्यात आला. त्यामुळे  संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे संदीप तायडे आणि सहाय्यक निरीक्षक आशा गवई यांनी ही कारवाई केली.

Web Title: RTO department fined 1 lakh 93 thousand rupees to three tippers! The Monte Carlo company vehicles were located by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.