एकाच गावात सहा ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:36+5:302021-05-12T04:35:36+5:30
कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता सरपंच लता मिलिंद खंडारे व ग्रामसेवक दीपक काळे यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ...
कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता सरपंच लता मिलिंद खंडारे व ग्रामसेवक दीपक काळे यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी उमरा देशमुख येथे कोरोना चाचणीच्या ६ शिबिराद्वारे संपूर्ण गावात दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचणी केली आहे. सोबतच १५० नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे १०० टक्के नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांसोबत युवकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉ. स्वप्नील चव्हाण, डॉ. श्वेता जाधव, डॉ. विशाल बाजड, डॉ. स्नेहा गडाख, सरपंच लता मिलिंद खंडारे, खरेदी- विक्री संघाचे संचालक भागवत देशमुख, आरोग्य सहायक काकडे, डाबेराव, जाधव, अवचार, आरोग्य सहाय्यिका अरुणा दाभाडे, मनीषा जेऊघाले, बेलसरे, ठाकरे, सुरवडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी गावातील नागरिकांची कोरोना चाचणी केली. यावेळी मुख्याध्यापक संजय हिरगुडे व शिक्षक विठ्ठल गावंडे यांनी सहकार्य केले.