रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:25 AM2017-11-15T01:25:38+5:302017-11-15T01:26:05+5:30

लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे.

Rubbish harvesting workout! | रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

Next
ठळक मुद्दे४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन 

हर्षनंदन वाघ। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आतापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली  असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामातील तूट भरून काढण्याचे आव्हान आहे.  त्यानुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून, १ लाख ३६ हजार मेट्रिक टन ख तही रब्बीसाठी उपलब्ध आहे.
जिल्ह्यात रब्बीचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.  त्यापैकी ४१  टक्केपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली. यासाठी १ लाख  ३६ हजार ५00 टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यात रब्बी  हंगामात  ज्वारी, मका, गहू ही पिके घेतली जातात. परतीच्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, रब्बीच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता  आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी त्याने मोठी ओढ  दिलेली होती. परतीच्या पावसाने जमिनीत ओल व विहिरीत समाधानकारक पाणी  आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बीची अपेक्षा आहे. सध्या पेरणी सुरू असून, सरत्या  आठवड्यापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली. सर्वांत जास्त पेरणी चिखली  तालुक्यात १७ हजार ३७४ हेक्टरवर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात  १0 हजार ९९५, जळगाव जामोद तालुक्यात ५00, संग्रामपूर २ हजार ५२५,  देऊळगाव राजा ३ हजार ९00, मेहकर २ हजार ६९४, सिंदखेड राजा ४ हजार  ८७४, लोणार ७ हजार ३२४, खामगाव ३ हजार ६0५, शेगाव ३४0, मलकापूर  ५७0, मोताळा १0६ व नांदूरा तालुक्यात २७0 हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात  आली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी शेतकरी प्रय त्नशील  असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्ध
यावर्षी रब्बीच्या पेर्‍याच्या अंदाजानुसार बियाणे व खतांच्या मागणीचा अहवाल  शासनाला एक महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने ८0 हजार २६  मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. तर शासनाकडून  एकूण १ लाख ३६ हजार ५00 मेट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली  आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खताचा साठा शिल्लक हो ता. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात मागणीपेक्षा जास्त म्हणजे एकूण १ लाख ३६  हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया ३१ हजार  मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ७00 मेट्रिक टन, एमओपी ६ हजार मेट्रिक टन व इ तर खतांचा समावेश आहे.

Web Title: Rubbish harvesting workout!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती