विकासकामांच्या देयकावरून बुलडाणा नगर पालिकेत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:24 AM2021-02-10T11:24:30+5:302021-02-10T11:24:36+5:30

Buldana Municipality स्वीकृत नगरसेवक आणि अकाउंट विभागातील एका कर्मचाऱ्यामध्ये विकासकामाचे देयक काढण्याच्या कारणावरून वाद झाला.

Ruckus in Buldana Municipality on payment of development works | विकासकामांच्या देयकावरून बुलडाणा नगर पालिकेत राडा

विकासकामांच्या देयकावरून बुलडाणा नगर पालिकेत राडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सर्व काही आलबेल असल्याचे कायम चित्र राहात असलेल्या बुलडाणा पालिकेत विकासकामांचे देयक काढण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत पालिकेच्या एका स्वीकृत नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यात खडाजंगी होऊन प्रकरणात हातापायीही झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.
 दरम्यान, हे प्रकरण नंतर थेट पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरही पोहोचले होते. मात्र, उभय बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत संबंधितांकडून माफीनामा घेतल्यानंतर प्रकरण निवळल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर बोलण्यास पालिकेतील कर्मचारी व नगरसेवक तयार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. हा ‘राडा’ सध्या चर्चेत आहे. नऊ फेब्रुवारी रोजी एक स्वीकृत नगरसेवक आणि अकाउंट विभागातील एका कर्मचाऱ्यामध्ये विकासकामाचे देयक काढण्याच्या कारणावरून वाद झाला. उभयतांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली व प्रकरण हातघाईवर आले. या प्रकरणाची चर्चा पालिका कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर  संबंधित नगरसेवकाच्या दबावाला न जुमानता पालिका कर्मचाऱ्यांनी कामकाजही बंद केले होते. पालिका कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही पोहोचले होते. त्याची माहिती अन्य नगरसेवकांना मिळाल्यानंतर तेही पोलीस ठाण्यात धावून गेले. त्यांनी संबंधित कर्मचारी व त्याच्या सहकाऱ्यांची समजूत घालून हे प्रकरण आपसात मिटवले. हे प्रकरण माफीनामा लिहून दिल्यानंतर शांत झाल्याची चर्चा सध्या शहरात आहे.  यासंदर्भात पालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नेमका काय प्रकार घडला, याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत बोलणेही टाळले जात होते. पोलीस प्रशासनास विचारणा केली असता, प्रकरण आपसात मिटल्याचे सांगण्यात आले. सोबतच पोलिसांत तक्रार झाली नसल्याचेही पोलीस सांगत आहेत.

Web Title: Ruckus in Buldana Municipality on payment of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.