खाते काढण्यासाठी बँक निहाय बदलतात नियम; झिरो बॅलन्सची अंमलबजावणी कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:56 PM2018-08-25T17:56:37+5:302018-08-25T17:59:21+5:30
बुलडाणा: बँक खाते काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांवर राष्ट्रीयकृत बँकामध्ये नियमांचा भडीमार होत आहे. तर बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या ग्राहकांचे आधार कार्ड देवूनही खाते काढून दिल्या जात नाही. त्यासाठी विविध कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून प्रत्येक बँकेच्या नियमावलीत तफावत दिसून येते.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: बँक खाते काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांवर राष्ट्रीयकृत बँकामध्ये नियमांचा भडीमार होत आहे. तर बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या ग्राहकांचे आधार कार्ड देवूनही खाते काढून दिल्या जात नाही. त्यासाठी विविध कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून प्रत्येक बँकेच्या नियमावलीत तफावत दिसून येते. शासनाच्यावतीने काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेली झिरो बॅलन्स अभियानाची अंमलबजावणी कागदावरच असल्याने अनेक लाभार्थी विविध योजनांच्या लाभापासून वंचीत राहत आहेत. कुठलाही आर्थिक व्यवहार बँकेवर अवलंबून आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचे मिळणारे अनुदानही बँक खात्यावरच येते. विद्यार्थ्यांसह वयोवृद्वांपर्यत प्रत्येकालाच बँक खाते काढण्याची आवश्यकता आहे. परंतू बँकेमध्ये खाते काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका नवनविन फतवे काढत असल्याचे दिसून येत आहे. बाहेरगावी राहणाºया व्यक्तीस त्याठिकाणी बँक खाते काढायचे असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्याठिकाणी तुमचा मुळ रहिवासी पत्ता आहे, त्याच भागातील बँक शाखेमध्ये तुमचे बँक खाते काढल्या जाईल, असे म्हणून अनेकांना माघारी पाठविल्या जाते. परंतू दुसºया बँकेतील नियम यापेक्षा उलट दिसून येतात. काही बँकेत केवळ आधारकार्डवर बँक खाते काढून दिल्या जाते. तर काही बँकामध्ये पॅनकार्डची सक्ती आहे. मात्र अनेकांच्या आधारकार्डमधील चुका अद्याप दुरूस्त न झाल्याने त्यांचे खाते निघू शकत नाही. प्रत्येक बँकेची नियमावली वेगवेगळी असल्याने ग्राहक व कर्मचाºयांमध्ये वारंवार वाद होतात. झिरो बॅलन्सवर खाते काढण्यास कर्मचारी टाळाटाळ करत असल्याने गोरगरीबांना आपले बँक खाते काढण्यास अडचणी जातात. त्यामुळे अनेकजण बँकेमध्ये खाते सुद्धा काढून शकत नाहीत.
भाडेकरुंना मागितले जाते घरमालकाचे आधार कार्ड
बाहेरगावी राहणाºया व्यक्तीला बँक खाते काढण्यासाठी ज्यांच्याकडे भाड्याने राहतात, त्यांचे आधार कार्ड व अर्ज मागितला जातो. मात्र हा नियम प्रत्येक बँकेत वापरला जात नाही. काही बँकामध्ये केवळ घरमालाकाच्या लाईट बिलावरूनही खाते काढून दिल्या जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे बँक खाते काढण्यासाठी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकाची नियमावली एकसारखी असणे आवश्यक आहे.
गर्भवती महिलांची दमछाक
गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भवतींसाठी ६ हजार रुपये मदत देण्याची खास योजना सुरू केली आहे. हे पैसे गर्भवती महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते काढण्याकरीता गर्भवती महिलांची दमछाक होत आहे. बाहेरगावी राहणाºया महिलांना बँक खाते काढण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यात अडचणी येतात. बॉक्स... खाते काढण्यासाठी मोजावे लागतात दोन हजार रुपये बँक खाते काढण्यासाठी दोन हजार रुपये लागतात. परंतू विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी खाते काढायचे असेल त्यांच्यासाठी दोन हजार रुपयांचा नियम ग्राह्य धरल्या जात नाही. तर ज्याठिकाणचा रहिवासी आहे, त्याच भागातील बँकेत त्यांनी खाते काढावे. बाहेरगावी राहत असेल आणि अतिमहत्वाचे असल्यास रहिवासी पुरावा देऊन बँक खाते काढून देण्यात येत असल्याची माहिती एका बँक व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.