ऐकावे ते नवलच...खामगावात पिवळ्या बेंडकांच्या पावसाची अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:40 AM2021-06-10T11:40:14+5:302021-06-10T11:40:20+5:30

Rumors of yellow frogs rain in Khamgaon: खामगाव आणि परिसरातील तलाव आणि पाणवठ्यावर आढळून येत असलेले बेडूक विषारी असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे.

Rumors of yellow frog rain in Khamgaon! | ऐकावे ते नवलच...खामगावात पिवळ्या बेंडकांच्या पावसाची अफवा!

ऐकावे ते नवलच...खामगावात पिवळ्या बेंडकांच्या पावसाची अफवा!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा परिसरात वाºयासारखी पसरली असून परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आहे. त्यामुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकही भयभित झाले आहेत.
खामगाव आणि परिसरातील तलाव आणि पाणवठ्यावर आढळून येत असलेले बेडूक विषारी असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अंधश्रध्दा परिसरात आहे. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत.

 
अपशकून घडणार असल्याची अफवा!
- कोरोना संकटाचे सावट गडद असतानाच खामगाव आणि परिसरात गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आले आहेत. हे बेडूक विषारी आहेत. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे बेडूक आढळून आल्यास अघटीत घडते. अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आलेल्या परिसरात अपशकून घडते, अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.

 
बेडकांचा पाऊस झाल्याची चर्चा
-तलाव आणि पाणवठ्यांवर आढळून येणारे बेडूक मान्सूनपूर्व पावसातून पडल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात होत आहे. पावसातून मासे पडू शकतात. तर बेडूक का नाही? असा प्रश्न ग्रामीण भागातील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी उपस्थित करत, बेडकांच्या पावसाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.


 
खामगाव आणि परिसरात आढळून आलेले बेडून उष्मकालीन समाधीतून बाहेर आलेले नर बेडूक आहेत. मिलनोत्सूक असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत. पावसातून बेडूक पडत नाहीत.
- यादव तरटे पाटील
पर्यावरण तज्ज्ञ, अमरावती.

 
- बेडूक पावसातून पडत नाहीत. पावसातून बेडूक बाहेर पडत असल्याची अंधश्रध्दा आणि अफवाच आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. प्रजनन कालासाठी हे बाहेर पडले आहेत.
- प्रताप मारोडे
निसर्ग तज्ज्ञ, संग्रामपूर.

 
- निसर्गात आढळून येणारे सर्वच बेडूक हे विषारी नसतात. मात्र, पावसाळ्यात आढळून येणारे काही बेडूक विषारी असू शकतात. असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. खामगाव आणि परिसरात हे बेडूक गत दोन-तीन दिवसांपासून आढळून येत आहेत.
- संजय गुरव
पक्षीमित्र तथा निसर्ग अभ्यासक, खामगाव.

Web Title: Rumors of yellow frog rain in Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.