हगणदरीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ; सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:15 AM2017-12-11T01:15:35+5:302017-12-11T01:17:26+5:30
बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी २0१८ अखेर बुलडाणा जिल्हा हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यातच जिल्हय़ातील सर्वात जास्त उद्दिष्ट गाठणे बाकी असलेल्या चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देण्यासाठी शनिवारी १३ अधिकारी सकाळी गावात रवाना झाले. त्यात अमडापूर, ईसोली, सातगाव भुसारी, मेरा खुर्द, डोंगर शेवली, किन्होळा, सवणा, करवंड, आंचरवाडी, मेरा बु., भरोसा, देऊळगाव धनगर, उंद्री या गावांचा समावेश आहे. यावेळी १३ अधिकार्यांनी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्रबोधन केले व ग्रामस्थांना हगणदरीमुक्तीचे आवाहन केले. या प्रबोधन मार्गदर्शन कार्यासाठी मुख्य लेखा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आर.एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. एस. ए. चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण सुनील मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील पसरटे, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, उप कार्यकारी अभियंता बांधकाम अलोने, कार्यकारी अधिकारी ग्रापापु एस.एस. राजपूत, कार्यकारी अभियंता सिंचन काळवाघे, समाजकल्याण अधिकारी एम. एम. मेरत, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. टी. मुकाडे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक पानझडे आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.