ग्रामीण भागात कुरड्या, पापड बनविण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:35 AM2021-04-04T04:35:43+5:302021-04-04T04:35:43+5:30

धामणगाव धाड : होळीचा सण झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांची घरातील कामे करण्यास सुरुवात होते. धामणगाव धाड परिसरात सध्या ...

In rural areas, kurda, papad is almost made | ग्रामीण भागात कुरड्या, पापड बनविण्याची लगबग

ग्रामीण भागात कुरड्या, पापड बनविण्याची लगबग

Next

धामणगाव धाड : होळीचा सण झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांची घरातील कामे करण्यास सुरुवात होते. धामणगाव धाड परिसरात सध्या महिलांचा कुरड्या, पापड्या, पापड आणि घरगुती साहित्य बनविण्याकडे कल दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील महिला होळीच्या पूर्वी वर्षभर पुरेल, असे मसाला, हळद, तसेच इतर साहित्य तयार करतात, तर मार्गशीर्ष महिन्यात साधारणपणे पापड करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. होळी झाल्यानंतर कडक उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे आगोटीची म्हणजेच पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये वर्षभर पुरेल इतके पापड, कुरड्या, खारोड्या, साबुदाणा पापड, शेवळ्या आदी साहित्य तयार केले जाते. ग्रामीण भागात उपराेक्त साहित्य वाळू टाकण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध असते, तर ग्रामीण भागातील महिला एकमेकींना घरगुती साहित्य करण्यासाठी मदतही करतात.

फोटो : धामणगाव येथे महिलांनी केलेल्या कुरड्या उन्हात वाळत घालण्यात आल्या होत्या.

Web Title: In rural areas, kurda, papad is almost made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.