ग्रामविकास अधिकारी पी.के.मोरे निलंबित
By Admin | Published: May 30, 2017 01:12 AM2017-05-30T01:12:15+5:302017-05-30T01:12:15+5:30
डोणगाव : डोणगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २६ मे रोजी ग्रामविकास अधिकारी पी.के.मोरे यांना निलंबित केले.
डोणगाव : डोणगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २६ मे रोजी ग्रामविकास अधिकारी पी.के.मोरे यांना निलंबित केले.
डोणगाव येथील विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार १७ मार्च रोजी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांनी याप्रकरणी २१ एप्रिलला अमरावती आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा करून ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे ही सादर केली होती. यावर २३ मार्च व २० मे रोजी चौकशी उपमुख्यकार्यकारी अधिकारी व पथकाने केली होती. त्यानंतर २६ मे रोजी पी.के.मोरे यांना निलंबित केले. सध्या डोणगावचा प्रभार जानेफळ येथील ग्रामविकास अधिकारी डी.टी. तांबारे यांच्याकडे देण्यात आला आहे.