ग्रामविकास, परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:06+5:302021-01-08T05:51:06+5:30

साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतींमध्ये सरळ लढत हाेणार आहे. १७ जागांसाठी ३५ उमेदवार ...

Rural development, straight fight in the transformation panel | ग्रामविकास, परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत

ग्रामविकास, परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत

Next

साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतींमध्ये सरळ लढत हाेणार आहे. १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २० महिला उमेदवारांचा समावेश आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तहसील कार्यालयात निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे, तसेच डाेअर टू डाेअर प्रचारास प्रारंभ झाला आहे.

१ ते ५ वार्डात सरळसरळ निवडणूक होत असून, वार्ड क्रमांक सहामध्ये एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. ग्राम विकास पॅनलकडून वार्ड क्रमांक एकमधून बेबीबाई जीवनसिंग राजपूत, आशा परवीन अक्तरखा , मो . असलम मो बशिर, वार्ड क्रमांक दोनमध्ये अश्विनी संतोष राजपूत, शेख रशिद शेख नासीर , स्नेहल रवींद्र पाटील, वार्ड क्रमांक तीनमध्ये ज्योती विनोद बेंडमाळी, उषा समाधान राजगुरु, वार्ड क्रमांक चारमध्ये शेख रफीक शेख शफी, रेखा सर्जेराव मंडळकर, दीपाली दत्तात्रय पोंधे, वार्ड क्रमांक पाचमध्ये महेंद्र श्रीधरराव पाटील, सविता संदीप खिल्लारे, माधुरी राहुल गवई, वार्ड क्रमांक सहामध्ये शेख बशिर शेख समीर , छाया सुनील गवई , राजू मदन डुकरे यांचा समावेश आहे. तर परिवर्तन पॅनलकडून वार्ड क्रमांक एकमध्ये शेख आयुब कुरेशी, ज्योती सचिन जाधव, सुरय्याबी मुस्ताक शहा वार्ड क्रमांक दोनमध्ये उल्हास प्रभाकर देशपांडे, अंकीता संग्रामसिंग सरगय्ये, वार्ड क्रमांक तीन सुनीता दिलीप बेंडमाळी , कौसल्याबाई संतोष मंडळकर , वार्ड क्रमांक चारमध्ये शारदा प्रवीण पाझडे , सय्यद रफीक सय्यद अक्रम , सुमन सुनील जगताप, वार्ड क्रमांक पाच गंगुबाई कमलाकर गवई , सुरेश हरिभाऊ गवई , संतोष श्रीकिसन जैस्वाल, वार्ड क्रमांक सहामध्ये लिलाबाई श्रीपत ठोके , शेख दाऊत कुरेशी , देवानंद आनंदा खंडागळे यांच्यात सरळ लढत होत आहे. सहामधून शेख सलीम शेख रशिद यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.

Web Title: Rural development, straight fight in the transformation panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.