ग्रामविकास, परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:08+5:302021-01-08T05:53:08+5:30
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीमध्ये सरळ लढत हाेणार आहे. १७ जागांसाठी ३५ उमेदवार ...
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीमध्ये सरळ लढत हाेणार आहे. १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २० महिला उमेदवारांचा समावेश आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तहसील कार्यालयात निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे तसेच डाेअर टू डाेअर प्रचारास प्रारंभ झाला आहे.
१ ते ५ वॉर्डांत सरळसरळ निवडणूक होत असून, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. ग्राम विकास पॅनलकडून वार्ड क्रमांक १ मधून बेबीबाई जीवनसिंग राजपूत, आशा परवीन अक्तरखा, मो. असलम मो बशिर; वार्ड क्रमांक २ मध्ये अश्विनी संतोष राजपूत, शेख रशिद शेख नासीर, स्नेहल रवींद्र पाटील; वार्ड क्रमांक ३ मध्ये ज्योती विनोद बेंडमाळी, उषा समाधान राजगुरू; वार्ड क्रमांक ४ मध्ये शेख रफीक शेख शफी, रेखा सर्जेराव मंडळकर, दीपाली दत्तात्रय पोंधे; वार्ड क्रमांक ५ मध्ये महेंद्र श्रीधरराव पाटील, सविता संदीप खिल्लारे, माधुरी राहुल गवई; वार्ड क्रमांक ६ मध्ये शेख बशिर शेख समीर, छाया सुनील गवई, राजू मदन डुकरे यांचा समावेश आहे. तर परिवर्तन पॅनलकडून वार्ड क्रमांक १ मध्ये शेख आयुब कुरेशी, ज्योती सचिन जाधव, सुरय्याबी मुस्ताक शहा; वार्ड क्रमांक २ मध्ये उल्हास प्रभाकर देशपांडे, अंकिता संग्रामसिंग सरगय्ये; वार्ड क्रमांक ३ मध्ये सुनीता दिलीप बेंडमाळी, कौसल्याबाई संतोष मंडळकर; वार्ड क्रमांक ४ मध्ये शारदा प्रवीण पाझडे, सय्यद रफीक सय्यद अक्रम, सुमन सुनील जगताप; वार्ड क्रमांक ५ मध्ये गंगुबाई कमलाकर गवई, सुरेश हरिभाऊ गवई, संतोष श्रीकिसन जैस्वाल; वार्ड क्रमांक ६ मध्ये लीलाबाई श्रीपत ठोके, शेख दाऊत कुरेशी, देवानंद आनंदा खंडागळे यांच्यात सरळ लढत होत आहे. सहामधून शेख सलीम शेख रशिद यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.