मुद्रांक खरेदीसाठी उडाली झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:41+5:302021-06-04T04:26:41+5:30

मुद्रांक विक्रेत्यांच्या परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनेक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण वेळेत न झाल्याने त्यांच्याकडे स्टॅम्प ...

The rush to buy stamps! | मुद्रांक खरेदीसाठी उडाली झुंबड!

मुद्रांक खरेदीसाठी उडाली झुंबड!

googlenewsNext

मुद्रांक विक्रेत्यांच्या परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनेक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण वेळेत न झाल्याने त्यांच्याकडे स्टॅम्प पेपर उपलब्ध नव्हते. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने खरीप हंगामासाठी शेतीची मशागत, बियाणे, खते खरेदीसाठी लगबग सुरू आहे. तथापि, गेल्या वर्षानंतर यंदाही पुन्हा कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांना घेरले असल्याने, शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्जाचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शेतकरी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यामध्ये मुद्रांक गरजेचा असल्याने मुद्रांकाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याने तुटवडा जाणवत आहे. ज्या मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांक उपलब्ध होतात त्यांच्या दुकानासमोर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागतात. पीक कर्जासाठी आवश्यक १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरला जादा पैसे मोजूनही वेळेत मिळत नाही.

मुद्रांकाअभावी अर्ज करावा तरी कसा?

पीक कर्ज व अनुदानित बियाण्यांची शेतकऱ्यांना गरज आहे. यामध्ये पीक कर्जासाठी प्रामुख्याने १०० रुपयाच्या मुद्रांकाची मागणी केली जात आहे. मात्र वेळेत मुद्रांक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामीण भागातून शेतकरी मुद्रांक मिळविण्यासाठी येथील जुने तहसील परिसरात येतात. मात्र, अनेकांना रिकम्या हाताने परतावे लागत आहे. पीक कर्ज व अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज करावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

परवाना नूतनीकरण रखडल्याचाही फटका

शहरात एकूण सात परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहेत. यातील चार विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण झाले आहे. मात्र, तीन विक्रेत्यांचे नूतनीकरण रखडले आहे, त्यामुळे या मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक मिळत नाही. परिणामी एकाच ठिकाणी मोठी गर्दी होते.

सहसा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परवाने नूतनीकरण होते. मात्र, यावेळी नूतनीकरणासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे, त्यातच कोरोनाचा काळ सुरू असल्याने अडचणी उद्भवल्या आहेत. अनेक विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे.

- गणेश (बंडू) बरबडे, जिल्हाध्यक्ष मुद्रांक विक्रेता संघटना.

Web Title: The rush to buy stamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.