भरधाव खासगी बस उलटली, १८ प्रवासी जखमी; सावखेड तेजन फाट्याजवळील घटना 

By संदीप वानखेडे | Published: June 7, 2024 04:16 PM2024-06-07T16:16:05+5:302024-06-07T16:17:08+5:30

ही घटना शुक्रवारी सावखेड तेजन फाट्यावजळील लभान देव मंदिराजवळील वळणावर घडली.

rushing private bus overturns 18 passengers injured incident near savkhed tejan fata in buldhana  | भरधाव खासगी बस उलटली, १८ प्रवासी जखमी; सावखेड तेजन फाट्याजवळील घटना 

भरधाव खासगी बस उलटली, १८ प्रवासी जखमी; सावखेड तेजन फाट्याजवळील घटना 

संदीप वानखडे,सिंदखेडराजा : भरधाव खासगी बस उलटल्याने १८ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सावखेड तेजन फाट्यावजळील लभान देव मंदिराजवळील वळणावर घडली. जखमींपैकी १२ जणांना प्रथमाेपचार करून सुटी देण्यात आली, तर सहा प्रवाशांना जालना येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पुण्याहून ३४ प्रवासी घेऊन खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक एआर ०६ ए ९७४२ मानोरा येथे जात होती. सकाळी ६ वाजेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. सदर बस उजव्या बाजूने उलटल्याने प्रवाशांना बराच वेळ बाहेर पडता आले नाही. या बसला इमर्जन्सी डोअर नसल्याने ही अडचण निर्माण झाली. मात्र, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

सर्व प्रवासी वाशिम जिल्ह्यातील-

या बसमध्ये पुणे व परिसरात कामासाठी गेलेले कामगार होते. त्यांचा परिवार होता. ही सर्व मंडळी वाशिम जिल्ह्यातील आपल्या गावाकडे जाण्यासाठी या बसने प्रवास करीत होती. मात्र, सिंदखेडराजानजीक हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात बसच्या दोन्ही चालकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. यातील एक चालक रवी रामचरण राठोड (रा. रेवणसिद्ध तांडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली) तर अन्य एक चालक अमोल ज्ञानदेव सातोरे (रा. कसुरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला) येथील आहे.

 जालना येथे रेफर केलेले रुग्ण -

या अपघातात दिनेश वासुदेव चव्हाण रा. मावळी तालुका, मानोरा, जिल्हा वाशिम, दर्शना ज्ञानेश्वर गायकवाड, वर्षा देवभान राठोड रा़ हाडदा साखरडोन तालुका जिल्हा वाशिम, गणेश वासुदेव चव्हाण, नामदेव फुलसिंग चव्हाण रा. चंदन नगर पुणे , आदित्य नामदेव चव्हाण रा़ चंदन नगर पुणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथे रेफर करण्यात आले आहे.

Web Title: rushing private bus overturns 18 passengers injured incident near savkhed tejan fata in buldhana 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.