केशर, दशेरी आंबे ६० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:39+5:302021-05-28T04:25:39+5:30
रोजगार सेवकांचे मानधन थकले बुलडाणा : गेल्या दोन महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकल्याने रोजगार सेवकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले ...
रोजगार सेवकांचे मानधन थकले
बुलडाणा : गेल्या दोन महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकल्याने रोजगार सेवकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या हातांना काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘कोरोना’ संकटासोबतच पाणीटंचाईशी दोन हात
किनगाव राजा : कोरोना विषाणूच्या संकटासोबतच परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत आहेत. नागरिकांना उन्हातान्हात मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे. तेथील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
बेबी केअर किटची प्रतीक्षा
बुलडाणा : अंगणवाडी केंद्रामध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून प्रथम प्रसूत मातेला बेबी केअर किट वाटप करण्यात येते. या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनेकांना बेबी केअर किटची प्रतीक्षा आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांनी काळजी घ्या
देऊळगाव मही : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळेही अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
२५ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील २५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
माळविहिरी येथे अज्ञात आजाराने डुकरांचा मृत्यू
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या माळविहीर ग्रामपंचायतअंतर्गत मागील वर्षी देखील मे-जून महिन्यांत अज्ञात आजारामुळे डुकरांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरू होते. परंतु संबंधितांकडून तेव्हाही या बाबीकडे लक्ष देण्यात आले नव्हते. आता पुन्हा कोरोना संसर्गासोबतच माळविहीर परिसरातील विश्वासनगर भागात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढली आहे. या परिसरामध्ये अज्ञात आजाराने डुकरे मृत्यू होत आहे.
लोकसहभागातून विलगीकरण कक्ष
धामणगाव बढे : येथील सहकार विद्यामंदिर येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा लोकसहभागातून विलगीकरण कक्षाचे उद्घाटन तहसीलदार समाधान साेनाेने यांच्या हस्ते करण्यात आले़. विलगीकरण कक्षासाठी दातृत्वाचे पालकत्व घेणाऱ्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.
इंधन जमा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना, चूलमुक्त व धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस दिले; परंतु गत चार महिन्यांत गॅसची किंमत वेगाने वाढत असल्याने सरपण गाेळा करण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे़
बैलांद्वारे नांगरणी झाली दुर्मीळ
धामणगाव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.