साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल : शाहिना पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:24+5:302021-01-23T04:35:24+5:30
२३ जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाबाबत संयोजन समिती सदस्यांनी २१ जानेवारीला ...
२३ जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाबाबत संयोजन समिती सदस्यांनी २१ जानेवारीला पत्रकार परिषदेतून संवाद साधला. यावेळी साहित्यिक नरेंद्र लांजेवार, आयोजक तथा मुख्य संयोजक ॲड. सतीशचंद्र रोठे, सुरेश साबळे, गणेश निकम आदी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयी मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीने संमेलन बहरणार असल्याची भूमिका शाहिना यांनी मांडली. आयोजक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी संघटनेची वाटचाल स्पष्ट केली. जिल्हा मुख्यालयी आयोजित संमेलन ही साहित्यिक मेजवानी असून, यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. नेताजींच्या विचारांना वाहिलेले हे देशातील पहिले संमेलन असल्याची भावना सुरेश साबळे यांनी व्यक्त केली. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन संयोजक तथा आयोजक समितीचे सदस्य गणेश निकम, संजय एंडोले, युवराज कापरे, आदेश कांडेलकर, श्रीकृष्ण कोकाटे, सुभाष निकाळजे उपस्थित होते.