सैलानी बाबाचा आज संदल निघणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:50 AM2018-03-06T00:50:04+5:302018-03-06T00:50:04+5:30
पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दूल रहेमान ऊर्फ सैलानी बाबाचा संदल ६ मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून रात्री ८ वाजता निघणार असून, शे.रफिक मुजावर, शे.चाँद मुजावर यांच्याहस्ते संदल घरातून पूजाविधी करून सैलानी बाबाच्या दर्ग्यावर चढविल्या जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

संदलसाठी भारताच्या कानाकोपºयातून खासगी वाहने, एस.टी. बसेसद्वारे लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. संदलसाठी पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज झाले असून, संदल बंदोबस्तासाठी ४० पोलीस अधिकारी, २७० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड, ६० ट्रॅफिक पोलीस, दोन दंगाकाबू पथक, दोन अग्निशमन दलाच्या गाड्या, श्वानपथक दाखल झाले असून संदलसाठी ५ मार्च रोजी सैलानी यात्रेत अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, ठाणेदार जे.एन.सय्यद यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन पिंपळगाव सराई येथील संदलचा बंदोबस्त करणाºया ५० पोलीस मित्र मंडळाच्या मुलांना टी शर्ट वाटप करून संदल बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पिंपळगाव सराई गाव ते पांधीच्या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली.