संत गजानन महाराजांची पालखी ६ आॅगस्ट रोजी शेगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:32 PM2019-07-30T14:32:41+5:302019-07-30T14:32:46+5:30
बुलडाणा: श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे
बुलडाणा: श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. पालखीचे सिंदखेड राजा येथे सोमवारी आगमन झाले. पालखी ५ आॅगस्ट रोजी खामगांव येथे येत आहे. सकाळी १० ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खामगांव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय, खामगांव येथे राहणार आहे. त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी सकाळी पाच वाजता पालखीचे शेगांवकडे प्रयाण होणार आहे. पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची होणारी गर्दी बघता पालखी खामगांव येथून बसस्टँण्ड ते जलंब नाका पुढे - शेलोडी- तिंत्रव मार्गे शेगांवला जाणार आहे. बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील वाहतूक ५ आॅगस्टचे सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. खामगाव बस स्टँड ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक ५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- जलंब नाका- एमआयडीसी टर्निंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व जलंब नाक्यापासून पुढे जलंब या पर्यायी मागार्ने वाहतूक वळविण्यात येणार आहे. खामगांव ते शेगाव रस्ता ६ आॅगस्टचे सकाळी ४ ते दुपारी पालखी संपेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव, खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगांवकडे वाहतूक या पयार्यी मागार्ने राहणार आहे.