संत गजानन महाराजांची पालखी २२ जुलैला सिंदखेडराजात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:59 AM2017-07-21T00:59:09+5:302017-07-21T00:59:09+5:30
सिंदखेडराजा : विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असून, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे २२ जुलै रोजी मुक्कामी येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असून, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे २२ जुलै रोजी मुक्कामी येत आहे.
पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना-नाव्हा मार्गे सिंदखेडराजा येथे गुरुवारला येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सरहद्दीवर श्रींच्या पालखीचे २२ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे दुपारी ४ वाजतापर्यंत आगमन होणार आहे. आपल्या मायभुमीत प्रवेश होताच दिंडीमधील सर्व वारकरी बेभान होऊन आनंदाने नामस्मरण करून ताल धरतात. प्रथम माळसावरगाव, नशिराबाद, फाट्यावर वारकऱ्यांना नास्ता, चहाचे वाटप केल्या जाते, तर सायंकाळी सिंदखेडराजा शहरामध्ये शोभायात्रा निघते. हजारो नागरिक दर्शनाचा लाभ घेतात. गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीतील सर्व वारकरी, गाड्या, घोडे, हत्ती यांच्या मुक्कामाची व्यवस्था जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येत आहे. जिजामाता विद्यालय शहरापासून थोडे अंतरावर असल्यामुळे नगर परिषदेने लाईटची व्यवस्था केली आहे. तसेच श्रींच्या दर्शनासाठी शहरामधील मुली, महिला मोठ्या संख्येने येतात. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी येथे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठवून तगडा बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणीही होत आहे. २३ जुलै रोजी पालखी किनगावराजा, दुसरबीड मार्गे बिबी येथे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.