संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर

By admin | Published: July 10, 2017 01:11 AM2017-07-10T01:11:47+5:302017-07-10T01:11:47+5:30

आषाढी यात्रेत सहभागी होऊन श्री गजानन महाराजांची पालखी शेगावसाठी ९ रोजी परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून निघाली.

Saint Gajananan Maharaj's Palakkhi return journey | संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर

संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर

Next

गजानन कलोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : अवघीच तीर्थ घडसी एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलीया, अवघीय पापे गेली डिगांतरी, वैकुंठ पंढरी देखिलीया, अवलिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलीया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलीया.
याच अभंगाचे प्रचिती वारीत सहभागी वारकऱ्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेत सहभागी होऊन घेतली. श्री गजानन महाराजांची पालखी ही यात्रा उत्सव आटपून शेगावसाठी ९ रोजी परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून निघाली.
श्रींची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह जेष्ठ शु. ६ (३१ मे ) रोजी पंढरपूरकडे रवाना झाली. श्रींची पालखी २ जुलै रोजी पंढरपूरला पोहचली. ८ जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी होती, तर ९ जुलै आषाढ शु. १५ शेगावसाठी पालखी परतीच्या प्रवासास सुरुवात करण्यात आली. कुईवाडी, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाळी, बीड, गेवडाई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार २९ जुलै खामगाव येथे, तर ३० जुलै रविवार शेगाव येथे पोहोचणार आहे. एकूण ५६३ किमीचा प्रवास २२ दिवस पूर्ण करून श्रींची पालखी शेगावात दाखल होणार आहे. श्रींची पालखी शेगावात सर्वप्रथम श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल होणार आहे. यावेळी श्रींचा रजत मुखवट्याचे पूजन संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त व श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते होईल.
श्रींच्या पालखीसमवेत भव्य प्रांगणात श्रींची आरती होईल. श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा दु. २ वा. निघेल, संध्याकाळी श्रींच्या पालखीची महाआरती व भव्य रिंगण वारकऱ्यांच्यावतीने केले जाईल.

Web Title: Saint Gajananan Maharaj's Palakkhi return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.