वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:04 AM2021-02-18T05:04:02+5:302021-02-18T05:04:02+5:30

विद्युत भारनियमनामुळे ग्रामस्थ हतबल अमडापूर : ३३ के.व्ही. उपकेंद्र मेरा खु. अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये काही दिवसापासून ६ ते ...

The salaries of medical officers and staff are exhausted | वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

Next

विद्युत भारनियमनामुळे ग्रामस्थ हतबल

अमडापूर : ३३ के.व्ही. उपकेंद्र मेरा खु. अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये काही दिवसापासून ६ ते ८ तास भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे मेरा खु., अंत्री खेडेकर, मेरा बु., गुंजाळा या गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे पाणी पुरवठाही ठप्प हाेत असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पाेफळी ते दाताळा रस्त्याची दुरावस्था

धामणगाव बढे : माेताळा तालुक्यातील पाेफळी ते दाताळा रस्त्याची गत काही दिवसापासून दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात हाेत आहेत. दाताळा ते धामणगाव बढे हा महत्वाचा रस्ता असून वाहनांची नेहमी वर्दळ राहते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: The salaries of medical officers and staff are exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.