‘रेमडेसीवीर’ची जादा दराने विक्री; कक्षसेवक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 03:14 PM2020-10-23T15:14:24+5:302020-10-23T15:14:29+5:30

Buldhana News रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी कक्षसेवकास बडतर्फ करण्यात आले आहे.

Sale of ‘remedesivir’ at an extra rate; ward boy Turminated | ‘रेमडेसीवीर’ची जादा दराने विक्री; कक्षसेवक बडतर्फ

‘रेमडेसीवीर’ची जादा दराने विक्री; कक्षसेवक बडतर्फ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील कोवीड समर्पीत रुग्णालयातील कक्षसेवकाने रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी त्यास बडतर्फ करण्यात आले आहे.
सात ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रश्नी पाच सदस्यीय समिती नियुक्त करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे बुलडाणा येथील कोवीड समर्पीत रुग्णालयातील कक्षसेवक सागर जाधव यास बडतर्फ करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सात ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. यामध्ये सचिन कदम, वैद्यकीय अधीक्षक सचीन वासेकर, फिजिशियन डॉ. असलम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा समावेश होता. या समितीने कक्षसेवक सागर जाधव याला प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानुषंगाने त्वरित कार्यवाही करून सागर जाधव यास बडतर्फ करण्यात आले आहे. कोवीड समर्पीत रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात कक्षसेवक म्हणून सागर जाधव कार्यरत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती.

Web Title: Sale of ‘remedesivir’ at an extra rate; ward boy Turminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.