रेशनच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:55 AM2017-07-21T00:55:08+5:302017-07-21T00:55:08+5:30

धाड : शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली रेशनचा ५१ क्विंटल तांदूळ बेकायदेशाररीत्या काळ्याबाजारात विक्रीस जाताना वाटेतच पोलिसांनी छापा मारून पकडला

Sales of ration rice in black market | रेशनच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री

रेशनच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री

Next


तांदूळ जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली रेशनचा तांदूळ बेकायदेशाररीत्या काळ्याबाजारात विक्रीस जाताना वाटेतच पोलिसांनी छापा मारून पकडला असल्याची घटना धाडपासून नजीक असणाऱ्या ग्राम चौथा ता. बुलडाणा या गावाजवळ बुधवारी घडली.
स्थानिक धाड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. परमेश्वर राजपूत, प्रकाश दराडे, पो.काँ. दशरथ शितोळे, पो.हे.काँ. विठ्ठल खोंड आज सकाळी ४ वाजतापासून ग्राम चौथा शिवारात सापळा रचून या ठिकाणी मेहकरवरून येणारे वाहन टाटा ४०७- एमएच ०२ - एक्सए ६५४१ यास थांबवून आरोपी चालक गजानन दुर्गेश मोहळे वय ३० रा. माळविहीर बुलडाणा याच्या ताब्यातून १०२ कट्टे तांदूळ वजन ५१ क्विंटल शासकीय सार्व. वितरण प्रणालीचे पोते बदलून सदर माल प्लास्टिक पोत्यात भरून मेहकरवरून जळगाव जिल्ह्यातील पहुर या ठिकाणी बाजारात विक्रीस जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्याने पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी त्यास तत्काळ अटक करून टाटा ४०७ सह पो.ठाण्यात जमा केले. त्याच्याकडून ५१ क्विंटल तांदूळ रक्कम १ लाख २ हजार रुपये व टाटा ४०७ रु. ४ लाख असा ५ लाख २ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
खुलेआमपणे तांदळाने भरलेला मेटॅडोअर हा काळ्याबाजारात विक्रीस जातो. रेशनचा माल हा बाजारात पोहोच होताना मध्येच कारवाई होते; परंतु सदरचा तांदूळ कोणाकडून कुणाकडे चालला होता, हे शोधून काढणे पोलिसांना आव्हान आहे. या प्रकरणात मोठेच रॅकेट सक्रिय असल्याची सध्या चर्चा आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३, ७ जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटील व पो.हे.काँ. ओमप्रकाश साळवे करीत आहे.

काळ्याबाजारात जाणारा तांदळाचा साठा पकडला असून, यात घेणार व देणार मालकांचा शोध घेऊन कारवाई होईल.
- संग्राम पाटील, ठाणेदार, धाड.

Web Title: Sales of ration rice in black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.