समर्थ दासबोध परिक्षेचे पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:46 PM2018-07-29T12:46:05+5:302018-07-29T12:48:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्री समर्थ विदयापीठ सातारा द्वारा आयोजित समर्थ दासबोध प्रथमा, द्वितिया व परिक्षेच्या विशेष प्राविण्यप्राप्त विदयार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रसंगी श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच इयत्ता ६ वीच्या विदयार्थ्यांनी सुमधुर आवाजात गुरूवंदना प्रस्तुत केली.
शिक्षकांनी गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू विषयी आपल्या भावना आदरयुक्त असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. आर्या जोशी हीने आपल्या भाषणातुन गुरूचे महत्व सांगितले. दासबोध प्रथमा परिक्षेत प्रथम मानकरी मंजिरी जोशी, श्रीहरी पाटील द्वितिय चैतन्य बोराळे, तृतीय तुहीन पाठक, होमी गाडोदिया, समृदधी निळे, सृष्टी भालतिडक, वैभवी पांडे, तसेच दासबोध द्वितिया परिक्षेत प्रथम कु, सृष्टी देशपांडे, अमिषा पहुरकर,द्वितिया नेहा लांडे, शरयु पाटील, तृतीय केतकी बानीले, हर्षी पायघन यांना प्राचार्या व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व कास्य पदके तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.प्राचार्या यांना समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अनमोल सहकार्याकरिता विशेष रूपाने सन्मानित करण्यात आले.