रेती माफीयांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 07:43 PM2020-10-06T19:43:30+5:302020-10-06T19:43:44+5:30
Crime News, Buldhana अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे्
अंढेरा : अवैध रेतीची वाहतुक करणारे टिप्पर पकडणाºया मंडळ अधिकाऱ्यावर रेती माफीयांनी हल्ला केल्याची घटना ६ आॅक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे्
६ आॅक्टोबर रोजी देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी रविंद्र काकडे व कोतवाल भगवान ढोले, संतोष घुगे यांचे पथक गस्तीवर असताना नारायणखेड फाट्यावजवळ त्यांना रेतीने भरलेले टिप्पर दिसले. त्यांनी टिप्पर थांबवून कागदपत्रांची मागणी केली. चालकांकडे कुठलेही कागदपत्रे नसल्याने काकडे यांनी टिप्पर जप्त केले. तसेच चालक संजय गवई रा. चिखला यास टिप्पर पोलिस स्टेशनला लावण्यास सांगितले. विना क्रमांक असलेल्या या टिप्परमध्ये चार ब्रास रेती होती. टिप्परच्या चाव्या घेत असतानाच एका कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी काकडे यांच्यावर काठ्यांनी मारहाण केली. तसेच रेतीने भरलेले टिप्पर पळवून नेले.या प्रकरणी काकडे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीसांनी संजय गवई व भरत पºहाड यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रेती माफीयांची महसूलच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे, रेती माफ ीयांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.