रेती माफियांकडून शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:22+5:302021-04-21T04:34:22+5:30
लोणार तालुक्यात सावरगाव तेली घाट असून त्याचा लिलाव होऊन उत्खनन व वाहतूक सुरू आहे. परंतु सकाळी एक पावती फाडली ...
लोणार तालुक्यात सावरगाव तेली घाट असून त्याचा लिलाव होऊन उत्खनन व वाहतूक सुरू आहे. परंतु सकाळी एक पावती फाडली ही त्याच पावतीवर दिवसभर वाहन सुरू राहत असून रेती सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त भरल्या जाते. येथील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबतीत परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, उपोषणसुद्धा केले आहे. दरम्यान, किनगाव जट्टू ते सावरगाव तेली रोडवर चेकपोस्ट लावण्यात आला होता; परंतु ते अधिकारीसुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष करतात. या रेती घाटातून पुढाऱ्यांचे वाहने सुरू असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चुप’ असेच सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूक होत असल्याने किनगाव जट्टू, सावरगाव तेली डांबरी रस्ता उखडला जात आहे. शासनाने ठरवून दिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तीचे उत्खनन झाले असून संबंधित ठेकेदार पूर्णा नदीपात्रातील मोठमोठे खड्डे रात्री पोकलँनद्वारे बुजून सपाटीकरण करून पुरावे नष्ट करतात. रात्रीला पोकलॅनद्वारे रेतीसुद्धा भरून देतात. दिवसा एक वाहन पंचवीस ते तीस मजूर एकाच गाडीवर रेती भरत असताना कोणत्याच प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. शेतकरी शेतात शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान फेरी मारण्याकरिता गेले असता शेतात पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीतील सिमेंटकडे जवळील पोकलँनद्वारे रेती गाड्यांमध्ये भरत असताना दिसून आले. सिमेंट कडे जवळील रेती भरणे थांबून ठेकेदारीतील भागीदार तथा वाहन मालक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत माहिती दिली. दरम्यान, त्यांनी शेतकऱ्यांना तुम्ही तहसीलदार आहात का, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याची ऑडिओ क्लिपसुद्धा आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून संबंधित महसूल अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकरी राजेश पवार, अविनाश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.