रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, सात टिप्पर केले जप्त; महसूल आणि पाेलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

By संदीप वानखेडे | Published: July 9, 2024 03:46 PM2024-07-09T15:46:22+5:302024-07-09T15:47:37+5:30

खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून माेठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग सातत्याने कारवाई करीत असले, तरीही उत्खनन सुरूच आहे.

Sand mafia's big smile, seven tippers seized; Joint operation of revenue and police administration | रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, सात टिप्पर केले जप्त; महसूल आणि पाेलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, सात टिप्पर केले जप्त; महसूल आणि पाेलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अंढेरा : खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून माेठ्या प्रमाणात वाहतुक करण्यात येत आहे़ रेती माफीयांना चाप लावण्यासाठी महसूल आणि पाेलिसांच्या संयुक्त पथकाने ८ जुलै राेजी रात्री काेम्बिंग ऑपरेशन राबवून सात टिप्पर जप्त केले. याप्रकरणी टिप्पर मालकांवर कारवाई करण्यात आली.

खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून माेठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग सातत्याने कारवाई करीत असले, तरीही उत्खनन सुरूच आहे. ८ जुलैच्या रात्री चिखलीचे तहसीलदार संताेष काकडे, तसेच महसूलचे कर्मचारी आणि अंढेराचे ठाणेदार विकास पाटील यांनी संयुक्तपणे काेम्बिंग ऑपरेशन राबवत इसरूळ येथील बस स्थानकावर सात टिप्पर जप्त केले. यापैकी पाच टिप्परमध्ये रेती भरलेली हाेती, तर दाेन टिप्पर खाली हाेते.

या टिप्परवर केली कारवाई

टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ६७७४, एमएच २८ बीबी ७५५६, एमएच २८ एबी ७८६३, एमएच २८ एबी ७६३६, एमएच २८ बीबी ६७२७ यांमध्ये रेती भरलेली हाेती, तसेच एमएच२८ बीवाय ४९४८ व बीबी २७९८ हे खाली टिप्पर पाेलिसांनी जप्त केले. याप्रकरणी उद्धव भगवान जेठे, आसाराम मुकिंदा कुसळकर, गणेश मधुकर घोटे, गणेश घोटे, कैलास सखाराम पायघन, अंकुश विष्णू इंगळे, रामेश्वर पंजाबराव सोळंकी, राजू आनंदा खरे, ज्ञानेश्वर अंबादास घुबे, शेख रशीद, अमोल राजू मुनमुले, पंजाब दिनकर घुबे, आनंदा विष्णू धायडे आदि चालक आणि मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

तहसीलदार संतोष काकडे, अंढेरा ठाणेदार विकास पाटील, भगवान पवार मंडळ अधिकारी चिखली, तलाठी योगेश भुसारी, तलाठी सुनील ढवळे, तलाठी नितीन काळे, चालक संतोष भोपळे व पोहेकाॅं भरत पोफळे, पोलिस काॅन्स्टेबल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल पोहरे, नितीन पुसे, चालक राज पवार आदिंचा कारवाई करणाऱ्या पथकात समावेश हाेता.

Web Title: Sand mafia's big smile, seven tippers seized; Joint operation of revenue and police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.