अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला रेती साठा गेला चोरीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:45 PM2019-07-30T12:45:15+5:302019-07-30T12:45:24+5:30
खामगाव : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या रेती साठ्यातील रेती चोरीस गेल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या रेती साठ्यातील रेती चोरीस गेल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी महसूल विभागाकडून पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
खामगाव तालुक्यातील वाडी आणि निमकोहळा येथील ११० ब्रास अवैध रेती साठा अप्पर जिल्हाधिकाºयांच्या पथकाने जप्त केला होता. जलंब येथे अवैध रेती वाहतूक करणाºया टिप्परने एका महिलेस २० जुलै रोजी चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर लागलीच दुसºया दिवशी म्हणजेच २१ जुलै रोजी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या पथकाने खामगाव शहरापासून जवळच असलेल्या वाडी येथील गट नं. ८ मधील ५५ ब्रास रेती साठा जप्त केला होता. त्याचप्रमाणे निमकोहळा येथील गट नं २२५ मधील ५५ ब्रास रेतीसाठा असा एकुण ११० ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते, नायब तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, शिपाई हिवाळे आणि चालक यादव यांनी ही धडक कारवाई केली. त्यानंतर महसूल प्रशासनाकडे या साठा सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, वाडी येथील गट नं. ८ मधील ५५ ब्रास रेतीपैकी काही रेती माफीयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (प्रतिनिधी)
अप्पर जिल्हाधिकाºयांनी जप्त केलेल्या साठ्यातील रेती चोरीस गेली आहे. रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तींनी ही रेती चोरून नेली असावी. याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात येणार आहे.
- डॉ.शीतलकुमार रसाळ
तहसीलदार, खामगाव.