मध्यप्रदेशाच्या पावतीवर शेगावातून रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:55 PM2020-10-12T15:55:46+5:302020-10-12T15:56:39+5:30
Sand Theft, Khamgaon news मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीतून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा होत आहे.
शेगाव : मध्यप्रदेश शासनाच्या स्वामीत्वधनाच्या पावतीवर शेगावातून रेतीची चोरी होत असल्याचा प्रकार रविवारी दुपारी एका तलाठ्याने उघडकीस आणला. तलाठ्याला लोटपाट झाल्याने त्याची तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतल्यानंतरही ती नोंदवण्याला तब्बल सहा तासापेक्षाही अधिक वेळ लागला.
विशेष म्हणजे, तक्रारीसंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार शिल्पा बोबडे तब्बल एक तास ठाण्यात ठाण मांडून होत्या. महसूल विभागाच्या डोळ््यादेखत सुरू असलेल्या या घोटाळ््याकडे जिल्हा खनिकर्म विभागाचेही तेवढेच दुर्लक्ष असल्याने हा प्रकार घडत आहे.
शेगाव येथे सूर्योदयापूर्वी ते सूर्यास्तानंतरही सातत्याने रेतीची चोरटी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावतात. त्यापैकी काही वाहने तर तहसील कार्यालयाच्या समोरून अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून वाहतूक करतात. त्या वाहनांवर कारवाई करण्याची हिंमत तर सोडाच उलट कारवाईसाठी पुढाकार घेणाऱ्यांवरच दबाव आणण्याचे प्रकार घडतात. तोच प्रकार रविवारी दुपारी घडला. मध्य प्रदेश शासनाच्या स्वामित्व धनाची पावतीवर शेगावातून रेतीची वाहतूक करणारे वाहन तलाठ्याने पकडले. दुपारी ३ वाजतापूर्वी ही कारवाई झाली. त्यावर तलाठ्याशी संबंधितांनी हुज्जत घातली. त्यामुळे याप्रकरणाची लेखी तक्रार देण्यासाठी तलाठ्याने पोलिसात धाव घेतली. त्याचवेळी तहसीलदार शिल्पा बोबडे यासुद्धा पोहचल्या. त्यांनी एक तास ठाणेदारांशी चर्चा केली. रात्री सात वाजतानंतर तलाठी आर.आर. बोराखडे यांच््या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी निखिल अनंत ढोले, आकाश अनंत ढोले, चालक सागर बंडू इंगळे यांच्यावर गुन्हे दाखल केले.
पूर्णा, मस नदीतून चोरी
मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीतून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा होत आहे. या रेतीची विक्री शेगाव शहरात सर्रासपणे सुरु आहे. शेगाव येथील तहसील प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. विशेष म्हणजे, रेती वाहतूक करणाºयांनीही दुपारी ठाण्यात पोहचून मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर शेगाव शहरात विकण्यासाठी एका मंडळ अधिकाºयाचा हातभार असल्याचा आरोप केला.
तालुक्यातील नदीतून उपसा करायचा आणि मध्यप्रदेशातील रॉयल्टी पावतीवर वाहतूक करायची, हा गोरखधंदा स्थानिक महसूल अधिकाºयांना माहिती आहे. तरीही एकाही वाहनावर कारवाई केलेली नाही.