खडकपूर्णातून रेतीची चोरटी वाहतूक

By admin | Published: July 2, 2016 01:13 AM2016-07-02T01:13:41+5:302016-07-02T01:13:41+5:30

सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीच्या पात्रातून रेतीची चोरी होत आहे.

Sandy traffic from rocks | खडकपूर्णातून रेतीची चोरटी वाहतूक

खडकपूर्णातून रेतीची चोरटी वाहतूक

Next

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा): खडकपूर्णा नदीपात्रातून गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीची अवैध चोरटी वाहतूक सुरू असून, या चोरट्या वाहतुकीच्या माध्यमातून दरवर्षी शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे या रेती माफियाला अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणार्‍या महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते व स्वत:ला समाजाचे सेवक म्हणून घेणार्‍या समाजाच्या ठेकेदारांकडून रेतीच्या व्यवहारात कोट्यवधींची माया जमा केली जात आहे. याकडे प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. मागीलवर्षी याच रेती घाटाचे मोजमाप केले असता ठेकेदारांनी प्रमाणापेक्षा अधिक रेतीचा उपसा केल्याप्रकरणी चार रेती ठेकेदारांवर १६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र, हे प्रकरण नंतर महसूल आयुक्त अमरावती यांच्याकडे गेले. तेथे प्रत्यक्षात दंड वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले नव्हते. यात महसूल विभागाचेच नुकसान झाले होते. यावर्षी पिंपळगाव कुडा रेती घाटाचा लिलाव ३९ लाख २0 हजार ८५0 रुपये, राहेरी खुर्द २३ लाख ५३ हजार ५२0 रुपये, राहेरी बु. १४ लाख रुपयांत लिलाव झाला, तर साठेगाव रेती घाटाचा लिलाव ३५ लाख ९९ हजार ९९९ रुपयांत व तढेगावचा रेती घाटाचा लिलाव ८0 लाख ३२ हजार ७७३ रुपयांचा झाला. रेती घाटाचा लिलाव करताना शासनाच्या नियमानुसार रेती घाटाची लांबी, रुंदी व खोलीचे मोजमाप करून खुणा उभ्या केल्या जातात. यावर्षी तर रेती घाटावर सीसी कॅमेरे बसविण्यात आले. तरीही रेती घाटावर दिवसाढवळ्या रेती ठेकेदारांसह रेती माफिया, गाव पुढार्‍यांचे ट्रॅक्टर, शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, लोक प्रतिनिधींच्या नावावर अनेक वाहन राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करताना दिसत आहेत. आर.एस. सुरडकर म्हणून नवे तहसीलदार रुजू झाले. त्यांनी एप्रिल ते जून २0१६ पर्यंत अवैध रेती माफियांवर ५४ प्रकरणांमध्ये ८ लाख ५३ हजार २00 रुपयांचा दंड वसूल केला, तर अवैध रेतीच्या १७ स्टॉक करणार्‍या माफीयांवर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवैध रेती माफियावर कारवाई करण्यास ते अयशस्वी ठरत आहेत. तीन वर्षांंत पाच कोटींचा दंड वसूल सिंदखेड राजा तहसीलदार संतोष कणसे यांनी अवैध रेती माफियांवर आळा घालण्यासाठी सन २0१३-१४ मध्ये २५३ वाहनधारकांकडून १२ लाख, सन २0१४-१५ मध्ये १0९ वाहनधारकांकडून सात लाख व मार्च १५ पर्यंंत ४९ वाहनधारकांकडून ४ लाख ५0 हजार रुपये दंड वसूल केला. रेतीचा स्टॉक करणार्‍या १८ केसेसमध्ये सातबारावर नऊ लाखांचा बोजा चढविला. तर वेगवेगळ्या ५00 प्रकरणांत ३0 लाखांचा महसूल गोळा केला. शासनाचे १४-१५ मध्ये ३ कोटी ३५ लाख महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. संतोष कणसे यांनी पाच कोटींचा महसूल गोळा करुन जिल्ह्यात सन्मान मिळविला होता.

Web Title: Sandy traffic from rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.