संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:33 AM2020-03-20T11:33:20+5:302020-03-20T11:33:27+5:30

चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले.

Sangrampur: Theft in court | संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास

संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास

Next

लोकमत न्युज नेटवर्क 
वरवटबकाल, ता. संग्रामपूर: तामगाव पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका १९ मार्चरोजी रात्री न्याय मंदिरालाच बसला. गेल्या कित्येक महिन्यापासुन संग्रामपुर परिसरात चोरत्यानी मंदिरे टारगेट केले असताना आज रात्रि त्यानी चक्क न्याय मंदिराच फोडले. १९  मार्चच्या रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले. नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली तरी पोलिस वेळेत पोहचले नाहीत. 
गेल्या कित्येक महिन्यापासुन संग्रामपुर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी न्यायालयात चोरी केली. याठिकाणी चौकीदार नसल्याने कुलूप तोडून चोरट्यानी आत प्रवेश  केला. दरम्यान आवाज आल्याने शेजारील काही नागरिक जागे झाले त्यांनी तामगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी गाड़ी पाठवितो, अस उत्तर मिळाले. जवळपास अर्धा तास चोरटे न्यायालय इमारतीत होते पण पोलिस न आल्याने परत अर्ध्या तासाने नागरिकांनी पोलिसांना फोन केला असता परत तेच उत्तर मिळाले. एक तासानंतर ही पोलिस न आल्याने शेजारील नागरिकांनी न्यायाधिशांना फोन करून माहिती दिली. तो पर्यन्त चोरट्यांनी हात साफ केला होता. त्यानंतर चोर्टयांनी पंचायत समितीतील निवासी संकुलाकडे वळविला आणि तेथील दोन घरात चोरी करुन जवळपास २ ते ३ लाखाचा ऐवज चोरुन तेथून त्यानी पळ काढला. तोपर्यंत न्यायाधिश महोदय न्यायालयात पोहचले. त्यांनी पोलिसांनी फोन केला. पोलिस उशिरा पोहचले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.  जवळपास १ तास न्यायालय परिसरात चोर असताना पोलिसांनी धाव घेतली असती तर कदाचित इतर ठिकाणी चोरी झाली नसती. तामगाव पोलिसांच्या निष्क्रीयतेचा फटका बसत असताना पोलिस अधिक्षक मात्र काहीही करायला तयार नसल्याचे दिसून येते. या भागात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Sangrampur: Theft in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.