ग्रामीण रुग्णालयात राबवले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:04+5:302021-05-23T04:34:04+5:30
ग्रामीण रुग्णालयात शासकीय कोविड सेंटर लवकर सुरू व्हावे व गावातील नागरिकांवर उपचार व्हावे, हा यामागील उद्देश आहे. यामध्ये ...
ग्रामीण रुग्णालयात शासकीय कोविड सेंटर लवकर सुरू व्हावे व गावातील नागरिकांवर उपचार व्हावे, हा यामागील उद्देश आहे.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल भाकडे, सरपंचपती नितीन इंगळे, ग्रामसेवक म्हस्के, संजय पवार, रवी धोंडगे, विवेक लहाने, संतोष शेळके, आनंद राठी, अरविंद आकोटकर, अभिषेक आकोटकर, युवासेना उपतालुकाप्रमुख पवन शेळके, सचिन गिरी, कैलास कुशलकर, योगेश काकडे गणेश धंदर, किरण गारोळे, राम आकोटकर, अमोल काकडे, ओम निकस, आशिष सावते, गणेश हिवाळे, बाळू देवकते, विजय कंकाळ, सागर मोरे, पवन पवार, शिवशंकर गायकवाड, संजय गिरी, पाखरे मामा, महिंद्र गवई, विशाल बनसोडे, मनोज पाखरे इ. सर्वजण सहभागी झाले होते. आ. संजय रायमुलकर यांनी सुरू केलेल्या माझं गाव कोरोनामुक्त गाव, या संकल्पनेला अनुसरून ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्याबाबत केलेली कृती होती, असे युवासेना उपतालुकाप्रमुख पवन शेळके यांनी सांगितले़