ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छता अभियान
By admin | Published: June 5, 2017 02:28 AM2017-06-05T02:28:18+5:302017-06-05T02:28:18+5:30
जागतिक पर्यावरण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा-खामगावदरम्यान असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ४ जून रोजी वन्यजीव सोयरे यांनी स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यातून रस्त्याने जाताना अनेक लोक दारूच्या काचेच्या शिश्या या जंगलाच्या कडेला फेकतात. काही मंडळी जंगलातच बसून अनेकदा दारू पितात आणि दारू िपणे झाले की लगेच जाताना त्या दारूच्या काचेच्या बाटल्या तेथेच लांब जंगलात फेकतात. ज्ञानगंगा अभयारण्यातून जात असताना अनेक ठिकाणी दर दोन, तीन फुटावर दारूची काचेची बाटली रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहावयास मिळते. यातील अनेक काचेच्या बाटल्या ह्या ज्ञानगंगा अभयारण्यात फुटून त्याचे तुकडे इकडे तिकडे पडलेले असतात. काचेचा तुटलेला छोटासा तुकडा पायात रुतला, तर आपला पाय रक्तबंबाळ होतो, ही सत्यता आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्य जीवास धोका आहे. या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापयर्ंत कितीतरी वन्य जीवांना इजा झाल्या असतील. त्या मुक्या वन्य जीवांच्या शरीरातून ही रक्तस्राव झाला असेल. मुक्या वन्य जीवांना इजा झाल्यावर ते बिचारे सांगणार कोणाला? त्यांचा उपचार करणार कोण? परंतु जंगलातील मुके वन्य जीव तशाच जखमा घेऊन आपले जीवन जगतात. या छोट्या-छोट्या काचेच्या बाटलीच्या जखमामुळे अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. या वन्य जीवांना आतापयर्ंत झालेल्या जखमांचा उपचार आपण करू शकत नाही; परंतु या दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणार्या इजा थांबवू शकतो. याचा विचार करून वन्य जीव सोयरे, बुलडाणा यांनी मागील वर्षी ५ जून २0१६ रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून ३५ पोते दारूच्या काचेच्या व प्लास्टिक बाटल्यांचा कचरा जमा केला होता.