स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाई कामगारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:20 PM2017-10-02T13:20:42+5:302017-10-02T13:20:42+5:30
बुलडाणा : देशभर स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही या अभियानाची व्याप्ती वाढविणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज स्थायी समिती सभेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांचा सन्मान पत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
१५ सप्टेंबर ते २ आक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांचा आज जिल्हा परिषद च्या स्थायी समिती सभेत अध्यक्ष सौ. उमाताई शिवचंद्र तायडे उपाध्यक्ष सौ. मंगलाताई संतोष रायपुरे सर्व पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुगराजन एस तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान पत्र तसेच गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. सफाई कामगार जे काम करतात ते अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते देश सेवाच करत आहेत. कारण स्वच्छता हा सर्वांगीण विकासाचा कणा आहे. आणि यामध्ये सफाई कामगारांची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून त्यांच्या कायार्चा गौरव करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन एस यांनी स्वत: त्यांचा सत्कार करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांचा सत्कार करून सर्व उपस्थितांना स्वच्छता ही सेवा अभियानाची शपथ देण्यात आली.