संजय गांधी योजनेचे १ कोटी ९४ लाख थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:05 PM2018-05-19T19:05:30+5:302018-05-19T19:05:30+5:30
मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब वयोवृध्द, विधवा, अपंग, परितत्या, आदिंसाठी शासनाने संजयगांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरमहा अनुदान देण्यात येते. शासनाची ही योजना चांगली असली तरी पण या योजनेत मेहकर तालुक्यात अनेक बोगस लाभार्थ्यांचा समावेश सुध्दा आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासुन सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून आॅनलाईन पद्धत सुरू झाल्याने बोगस लाभार्थी कमी झाले असले तरी मागच्या काळात ज्यांना अनुदान मंजुर झाले आहे, त्यांना अजुनही अनुदान सुरू आहे. त्यामुळे खरे व पात्र लाभार्थी शासनाच्या या योजनापासून वंचित राहत आहेत. संजय गांधी कार्यालयाअंतर्गत श्रावण बाळ योजनेचे ११ हजार ८८७ तर संजय गांधी निराधार योजनेचे ४ हजार २६७ असे एकूण १६ हजार १५४ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे १ कोटी ९३ लाख ८४ हजार ८०० रूपये अनुदान थकित आहे. अनुदान मिळण्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थी दररोज संजय गांधी कार्यालयात चकरा मारत आहेत. संजय गांधी कार्यालयातील नायब तहसिलदार यांचे पद रिक्त असल्याने दुसºया नायब तहसिलदाराकडे प्रभार देण्यात आला आहे. कार्यालयातील कर्मचारी सुरूळीत काम करीत असले तरीपण कायम स्वरूपी अधिकारी नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे थकीत असलेले अनुदान लवकरात लवकर वाटप करण्यात यावे व कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)