सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:40 PM2019-06-29T12:40:59+5:302019-06-29T12:41:09+5:30
राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
- अनिल उंबरकार
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव- सुजलाम सुफलाम मतदार संघाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. पुढील पाच वर्षात जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ राज्यात एक माॅडेल मतदार मतदार संघ बनविण्याचा प्रयत्न राहील. सोबतच सर्व राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. मंत्री झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यात प्रथम आगमन झाले. यावेळी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढील पाच वर्षाच कामगार कल्याणाचं "व्हिजन" व त्याच नियोजन लवकरच करणार आहे. भ्रष्टाचार मुक्त , पारदर्शीपणा व वेगवान पध्दतीने काम करणार आहे. मराठा आरक्षण कोर्टात वैध ठरल्याचा आनंद आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने या समाजातील गोरगरीब जनतेला या आरक्षणामुळे संधी संधी प्राप्त झाली आहे.मराठा समाजासोबतच भटके जमाती, विमुक्त जाती,विशेष मागासवर्गीय व कामगार कल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली.
जळगाव जा. विधानसभा मतदार संघात 140 गाव पाणी योजना सुरू केली. शेगावला वाण धरणावरून थेट पाणी पुरवठा योजना सुरू आहे.तसेच शेगाव तालुक्यातील खारपाणपट्ट्याचा येणारी आणखी 30 गावांना विशेष पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून निविदा प्रक्रिया सुध्दा झाली आहे. लवकरच 30 गाव पाणी पुरवठा योजनेला आरंभ होणार आहे. त्यामुळे जळगाव जा विधानसभा मतदार संघातील जळगाव जा, संग्रामपूर व शेगाव तालुका पाणी समस्यामुक्त होणार आहे. जनतेला पिण्यायोग्य शुध्द पाणी गावागावात पोहोचणार आहे. आदिवासी भागातील पुनर्वसन व विविध योजना त्या जनतेला मिळत असल्याचे समाधान आहे. माझ्या मतदार संघासोबत माझा जिल्हा विकासामध्ये अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न राहिल असेही कुटे म्हणाले.