विधीमंडळ पंचायत राज समिती प्रमुखपदी संजय रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:04 IST2020-11-06T12:04:04+5:302020-11-06T12:04:38+5:30
Dr. Sanjay Raymulkar News बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आमदारास समिती प्रमुखपद मिळाले आहे.

विधीमंडळ पंचायत राज समिती प्रमुखपदी संजय रायमुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/मेहकर: विधीमंडळाच्या पंचायत राज समिती प्रमुखपदी मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समिती प्रमुखास राज्यमंत्र्याचा दर्जा असतो.
बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आमदारास हे समिती प्रमुखपद मिळाले असल्याने यास एक महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी अंदाज समिती, रोजगार हमी योजना समिती आणि महिला व बालहक्क समिती सदस्य म्हणून काम पाहले आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या या समितीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील प्रसासन व्यवस्थेवर सखोल, प्रभावी अभ्यास करून नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतकडे लोकहिताचे व कल्याणकारी कामे होण्याच्या दृष्टीकोणातून ही समिती काम करते. समितीमध्ये एकूण २५ सदस्य असतात.
या समितीच्या प्रमुख पदी पाच नोव्हेंबर रोजी नियुक्ती झाल्यानंतर आ. डॉ. संजय रायमुलकर यांचे आ. संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रा. नीलेश गावंडे, अबिजीत राजपूत, गजानन दांदडे, खा. प्रतापराव जाधव यांचे सिव गोपाल डिके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.