विलुप्तप्राय औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!
By Admin | Published: September 7, 2014 12:37 AM2014-09-07T00:37:30+5:302014-09-07T00:43:36+5:30
अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्याची निवड; ७५ हजार वनौषधी रोपट्यांची लागवड.
खामगाव: र्हासाच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींना बुलडाणा जिल्ह्यात संजीवनी लाभली आहे.
र्हास पाऊ लागलेल्या औषधी वनस्पतींच्या लागवड आणि संगोपनासाठी बुलडाणा जिल्ह्यातील दहा वनग्रामांची निवड करण्यात आली आहे. यासाठी या वनग्रामांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्वेदिक मंडळाच्या वतीने प्रत्येकी पाच लक्ष ६७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. औषधी रोपवन लागवडीसाठी अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्याची निवड झाली आहे.
गत काही वषार्ंत बुलडाणा जिल्हा वन संवर्धनात अग्रेसर राहीला आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे अमरावती वन परिक्षेत्रात बुलडाणा जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता जिल्ह्यातील दहा वनग्रामांची राष्ट्रीय आयुर्वेदिक औषधी महामंडळाकडून औषधी रोपवन लागवडीसाठी निवड झाली आहे. या दहा वन ग्रामांमध्ये २५0 हेक्टरवर दोन लक्ष ७५ हजार औषधी वृक्ष रो पट्यांची लागवड करण्यात आली आहे.
र्हास पाऊ लागलेल्या औषधी वनस्पती व वृक्षांचे संगोपन करण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. औषधी रोपवनासाठी अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याची निवड झाली असल्याच्या वृत्तास वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहीवाल यांनी दुजोरा दिला.
** बहुपयोगी औषधी वनस्पतींचे जतन
गेल्या काही वर्षांंत वृक्षतोड आणि जगंलांच्या हानीमुळे अनेक वनौषधी र्हास पावत आहेत; मात्र विविध औषधी वनस्पतींचे जतन करण्याचा मह त्वकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय आयुर्वेदिक मंडळाकडून औषधी रोपवनासाठी वनग्रामातील २५ हे क्टर वन परिक्षेत्रात लागवडीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले असून, प्रत्येक वन ग्रामामध्ये २७ हजार ५00 वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.
** या वनस्पतींची केली लागवड
जिल्ह्यातील दहा वनग्रामांसाठी पाच कोटी ७0 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत अडुळसा, शतावरी, तुळस, अश्वगंधा, आवळा, हिरडा, बेहडा, नीम, करंज, बिबा, अर्जून, मुरडशेंग, मुश्कंद, पुत्रजिवा, कांचन, शिकेकाई, निगरुडी कड, आदी औषधी वनस्पती आणि औषधी वृक्षांची लागवड केली जात आहे. या वनस्पतींची रोपटी औरंगाबाद, जळगाव, हिंगणघाट, अमरावती, नागपूर या ठिकाणांहून आणण्यात आली आहेत.