२८५ उमेदवारांवर पराभवाची संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:30+5:302021-01-18T04:31:30+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १३७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. ...

Sankranti of defeat on 285 candidates | २८५ उमेदवारांवर पराभवाची संक्रांत

२८५ उमेदवारांवर पराभवाची संक्रांत

googlenewsNext

देऊळगाव राजा : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १३७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. जुन्या नगरपालिकेच्या टाऊन हॉलमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, आठ टेबलवर एकूण बारा फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल जाहीर केले जाणार आहेत.

मतमोजणीसाठी एकूण ६५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २६ पैकी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, एकूण १९९ जागांपैकी ६२ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १३७ जागांसाठी मतदान झाले असून, एकूण टक्केवारी ७७.२४ इतकी आहे. या निवडणुकीत १३७ जागांसाठी ४२२ उमेदवार रिंगणात असून, यापैकी २८५ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. ४२२ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झालेे. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी एकूण मतदार संख्या ४० हजार ५८२ इतकी होती. त्यामध्ये १९ हजार ३७० महिला, तर २१ हजार २१२ पुरुष होते. त्यापैकी १४ हजार ८४० महिला, तर १६ हजार ५०६ पुरुष याप्रमाणे ३१ हजार ३४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी आठ वाजता जुन्या नगरपालिकेच्या टाऊन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बिनविरोध झालेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये पिंपळगाव बुद्रुक, नागनगाव आणि पाडळी शिंदे या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील देऊळगाव मही ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, याठिकाणी होऊ घातलेली यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. याठिकाणी दोन पॅनल आमनेसामने उभे ठाकले आहेत. आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

Web Title: Sankranti of defeat on 285 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.