संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:10 PM2018-09-09T12:10:30+5:302018-09-09T12:11:02+5:30

नांदुरा तालुक्यातील ग्राम वसाडी बु. ने ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. 

Sant Gadgebaba Village Cleanliness Campaign; Gram panchayat Vasadi is the first in Nandura taluka | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा :  येथून जवळच असलेल्या व परिसरात येणाºया नांदुरा तालुक्यातील ग्राम वसाडी बु. ने ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत घेण्यात येणाºया संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वसाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेण्यात आली. यामध्ये गावातील रस्ते, नाल्या, शौचालये, घरकुले व पाणी पुरवठा तसेच महत्वाचे म्हणजे हगणदारी मुक्ती ही कामे प्रत्यक्ष मार्गी लावण्यात ग्रामपंचायत वसाडीचे सरपंच वनिता बळीराम गिºहे, सचिव राऊत तसेच सदस्यगण यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच नागरीकांना पाणी पुरवठा व स्वच्छतेविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या कामांची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलडाणा यांचेवतीने ६ सप्टेंबर रोजी जि.प. बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुखराजन एस. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे व जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे यांचे हस्ते सरपंच वनिता बळीराम गिºहे यांचा शाल सन्मानचिन्ह व १ लाख रूपयांचा चेक असे पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. यावेळी वसाडी येथील सरपंच पती बाजीराव गिºहे, उपसरपंच बशीरखॉ, सचिव राऊत, माजी उपसरपंच शिलाताई बोदडे, इतर ग्रा.पं.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. या ग्रामपंचायतने अनेकवेळा पुरस्कार पटकाविले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Sant Gadgebaba Village Cleanliness Campaign; Gram panchayat Vasadi is the first in Nandura taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.