शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 07:59 PM2017-10-24T19:59:18+5:302017-10-24T19:59:46+5:30

बुलडाणा :  सरकार मस्त व जनता त्रस्त अशी स्थिती सध्या देशात, राज्यात व जिल्ह्यात झालेली आहे. जनतेचा आक्रोश सरकारी दरबारी दाबला जात आहे, हाच आक्रोश शिवसेना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात हजारो लोकांनी मोर्चाच्या रुपाने २४ आॅक्टोबर रोजी व्यक्त केला. 

Sarkash Morcha on Shiv Sena's District Collectorate | शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Next
ठळक मुद्देमाजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात निघाला मोर्चासरसकट कर्जमाफी व सोयाबीनला ५००० हजार रुपये हमीभाव जाहीर करा - मागणी  

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  सरकार मस्त व जनता त्रस्त अशी स्थिती सध्या देशात, राज्यात व जिल्ह्यात झालेली आहे. जनतेचा आक्रोश सरकारी दरबारी दाबला जात आहे, हाच आक्रोश शिवसेना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात हजारो लोकांनी मोर्चाच्या रुपाने २४ आॅक्टोबर रोजी व्यक्त केला. 
 महागाई शेतकºयांच्या फाशीसह विविध देखाव्यासह शिवालय या संपर्क कार्यालयापासून निघालेला मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारगल्ली, सराफालाईन, संभाजीनगर, कारंजाचौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे विविध भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे  निवेदन देण्यात आले. त्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी देऊन जाचक अटी रद्द करा, जीएसटी मुळे सर्वसामान्य नागरिकांची, व्यापा-यांची होणारी आर्थिक लूट थांबवून  रद्द करून पूवीर्ची कर प्रणाली कायम ठेवा. सोयाबीनला ५००० हजार रुपये हमीभाव जाहीर करून तात्काळ खरेदी केंद्रे जाहीर करा. कापसाला ६०००  रुपये हमीभाव जाहीर करून खरेदी केंद्र सुरू करा. सोयाबीन, उडीद, मूग विकलेल्या शेतकºयांना व्यापाºयांकडून कमी भाव मिळाल्याने हेक्टरी १०००० रुपये बोनस द्या. ग्रामपंचायतने मागविलेल्या घरकुलाच्या ड यादीनुसार लाभार्थ्यांना तसेच इंदिरा आवास योजनेअंतर्गत जुन्या रद्द केलेल्या याद्याप्रमाणेच लाभार्थ्यांना तात्काळ घरकुले मंजूर करा. शहरी व ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद करा व विज बिलासंबंधीच्या तक्रारी तात्काळ सोडवा. श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांची वयोमयार्दा ६५ वरून ६० वर्षे करा तसेच संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार, विधवा, परीतत्तश्वया व अपंग योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २००० रु करा. ५० वर्षे वयावरील शेतकरी व शेतमजुरांना तात्काळ पेन्शन योजना लागू करा आदी लोकोपयोगी मागण्या मोर्च्याच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली. शिवसेनेच्या या आक्रोश मोर्चात दोन जिवंत देखावे सादर करण्यात आले होते. त्यामध्ये पहिला देखावा हा शेतकºयांना जुनी कर्जमाफी, ना नवीन कर्ज त्यामुळे जिवनाचा गाडा कसा चालवावा, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांचे मुलीचे लग्न मोडले त्यामुळे त्याने फाशी घेतली व जिवन संपवले असा जिवंत देखावा अजीसपूर येथील तोताराम तुकाराम जगताप, विमलबाई तुळशीराम मोरे यांनी सादर केला. तर दुसरा देखावा शेतकºयांच्या मालाला भाव नाही. त्यातच नोटाबंदी, जीएसटी, वाढती महागाई असा देखावा अजिसपूरचे नारायण किसन काटे, त्र्यंबकगिर मोहनगिर गोसावी, कावीरी, पंढरी, भारती यांनी सादर केला व हे देखावे मोर्चाचे खास आकर्षण होते. 
यावेळी मोर्चात शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब कोरके, महिला आघाडी, अर्पिताताई विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे, शिव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख संजय हाडे, शिव ग्राहक सेना जिल्हा प्रमुख गिरीश वाघमारे, तालुका प्रमुख अर्जून दांडगे, शिव वाहतूक सेना तालुकाप्रमुख संजय मोटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, देऊळगावराजा माजी तालुका प्रमुख प्रकाश गीते, कृष्णा झोरे, साहेबराव डोंगरे, शरदचंद्र पाटील, सुखदेव शिंबरे, रवी पाटील,  निलेश राठोड, शोभाताई पाटील, संगीता पवार, वैशाली ठाकरे, अंजना खुपराव, भारतीबाई, सागवन सरपंच कांताताई राजगुरे, अनुसया वाघमारे, हरिभाऊ सिनकार, दादाराव काटोले, विजय जायभाये, अशोक इंगळे, उमेश कापुरे, समाधान मोरे, मनोज यादव, राजेंद्र पवार, सुहास वानरे, दिलीप तोटे, पुरुषोत्तम हेलगे, हेमंत खेडेकर, कैलास माळी, राजेश ठोंबरे, संजय धंदर, पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटीया, गजानन कुºहाळे, माधव पाटील, माणिकराव सावळे, अनिल जगताप, र सुभाष लहाने, सुभाष पवार, ओमसिंग राजपूत, गोविंदा खुमकर, विनोद गव्हाणे, प्रकाश देशलहरा, सचिन परांडे, गजेंद्र दंडाडे आदींची उपस्थिती होती.

मोर्चात मुस्लिमांची लक्षणीय उपस्थिती
शिवसेनेच्या आजच्या या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व बुरखाधारी मुस्लीम भगिनी गळ्यात भगवा रुमाल घालून व हातात मागण्यांचे फलक घेवून सहभागी झाल्या होत्या. सर्व जातीधर्माचे महिला-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. 

भाजप सरकारने शेतकºयांना चोर ठरविले - विजयराज शिंदे
विजयराज शिंदे मोर्चेकºयांना संबोधित करताना म्हणाले की, आज मातीमोल भावाने सोयाबीन आणि कापूस विकण्याची वेळ शेतकºयावर आली आहे.स्वातंत्र्यानंतर या देशात हे पहिले वर्ष असेल की रब्बीची पेरणी सुरु झाली तरीही खरीफाचे कर्ज नाही.आॅनलाईन अर्जाच्या कचाट्यात शेतकरी आॅफलाईन होण्याची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी मांडली. व्ही.पी. सिंग यांच्या काळात पहिल्यांदा १० हजार रुपयांची कर्जमाफी झाली होती, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देता की जाता अशा रेट्यामुळे ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती पण दोन्ही वेळेस कधी अर्ज भरण्याची वेळ शेतकºयांवर आली नव्हती. रोज नवीन कायदा आणत आहेत, वेळोवेळी निकष बदलवित आहे, शेतकºयांचे अंगठे घेत आहेत,     त्यांच्या बायका-पोरांनाही लाईनमध्ये उभे करून ठेवले आहे. या भाजपा सरकारने सर्व शेतकरी चोर ठरविला आहे, असा घणाघाती आरोपही शिंदे यांनी लावला. जीएसटीमुळे व्यापार ठप्पर आहे, महागाई वाढली आहे, सर्वसामान्यांचे खिशे कापले जात आहेत.शेतकºयांची दसरा-दिवाळी गेली पण कर्जमाफीचा पैसा नाही मिळाला. हे नुसतं घोषणा करणारं आणि भुलभुलैय्याचं सरकार आहेह्ण, या शब्दांत शिंदे यांनी सरकारवर टिका केली.

Web Title: Sarkash Morcha on Shiv Sena's District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.