वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्पमित्र महिलेची धडपड!

By admin | Published: April 3, 2017 01:47 PM2017-04-03T13:47:59+5:302017-04-03T13:47:59+5:30

वने, पर्यावरण, सर्प, वाघ आदी वन्यजीवांचे महत्व पटवून त्यांचेसंवर्धन होण्यासाठी मेहकर येथील महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांची धडपडसुरू आहे.

Sarpamitra woman struggle for wildlife conservation! | वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्पमित्र महिलेची धडपड!

वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्पमित्र महिलेची धडपड!

Next

ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेह्ण: जिल्ह्यातील विविध वन पर्यटनस्थळांवर चित्रीकरण

बुलडाणा : वने, पर्यावरण, सर्प, वाघ आदी वन्यजीवांचे महत्व पटवून त्यांचे
संवर्धन होण्यासाठी मेहकर येथील महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांची धडपड
सुरू आहे. त्या  वन व वन्यप्राण्यांचे महत्व पटवून देणारे ह्यवृक्षवल्ली
आम्हा सायरे वनचरेह्ण अशी चित्रफित तयार करित असून त्यासाठी जिल्ह्यातील
विविध वन व पर्यटनस्थळावर त्या चित्रीकरण करित आहेत.
वने, वन्यजीव, पर्यावरण, सर्प, वाघ आदींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी
मेहकर येथील सर्पमित्र वनिता बोराडे यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला
आहे. वनिता बोराडे ह्या ह्यवृक्षवल्ली आम्हा सायरे वनचरेह्ण अशी एक मालिका
तयार करित असून, या माध्यमातून पर्यावरण व साप वाचवा, पशू-पक्षी व जंगल
वाचवा याचे महत्व पटविण्यात येणार आहे. तसेच सापांविषयीचे गैरसमज नष्ट
करून भिती व अंधश्रद्धा दुर करण्यासाठी जिल्ह्यातील विविध वन व
पर्यटनस्थळावर चित्रीकरण करण्यात येत आहे. या चित्रीकरणाला संगीतकार
पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आहे. सर्पमित्र डी.भास्कर यांनी या
संपूर्ण चित्रीकरणाचे लेखन केले आहे. या लेखनातून त्यांनी वन्यजीव बचाव
प्रसंगाचे वर्णन केलेले असून सापाविषयींचे गैरसमज यावरही प्रकाश टाकला
आहे. हिवरा आश्रम येथे संगीतकार ह्रदयनाथ मंगेशक यांच्या भावसागर या
कार्यक्रमातून वृक्षवल्ली आम्हा सायरे वनचरेचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: Sarpamitra woman struggle for wildlife conservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.