पिंप्रीगवळी येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अपात्र घोषित
By अनिल गवई | Published: July 26, 2023 02:12 PM2023-07-26T14:12:34+5:302023-07-26T14:12:46+5:30
अमरावती विभागीय अपर आयुक्तांचा आदेश, पतिराजांचा अवास्तव हस्तक्षेप अंगलट
खामगाव: ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आपल्या कर्तव्यात कसूर आणि पदाचा दुरूपयोग केल्याचे सिध्द झाल्याने पिंप्री गवळी येथील महिला सरपंच, महिला उपसरपंच आणि महिला सदस्या अशा तिघींना एकाचवेळी अपात्र करण्यात आले. अमरावती विभागीय अपर आयुक्त गजेंद्र बावणे यांनी हा आदेश िदला. या आदेशामुळे पिंप्री गवळी ग्रामपंचातयीत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, िपंप्री गवळी येथील ग्रामपंचातीतील सरपंच सिमा राजेंद्र इंगळे, उपसरपंच मुक्ता चेतन फुंडकर, सदस्य उज्वला गजानन भोंबळे आपल्या पदाचा दुरूपयोग आणि कर्तव्यात कसूर करीत असल्याची तक्रार भास्कर बबन इंगळे रा. पिंप्री गवळी यांनी अमरावती विभागीय अपर आयुक्तांकडे केली. या तक्रारीत ग्रामपंचायतीत महिलांच्या कामकाजात पती राजांचा अवास्तव हस्तक्षेप असल्याचे तक्रारीत नमूद केले. सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालयात कधीही व्यक्तीश: हजर राहत नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे पतीराजच कार्यालयातील कामकाज चालवित असल्याचा आरोपही त्यांनी तक्रारी केला.
यासंदर्भात छायाचित्र आणि काही पुरावेही तक्रारीसोबतच सादर करण्यात आले. त्याअनुषंागाने चौकशी अंती अपर आयुक्तांनी संबंधितांवर कर्तव्यात कसूर आणि पदाचा दुरूपयोगाचा ठपका ठेवत अपात्र घोषीत केले. याप्रकरणी तक्रारकर्ते इंगळे यांच्या बाजूने ॲड. विरेंद्र झाडोकार यांनी कामकाज पाहीले.
महिलांच्या कामात पतिराजांनी हस्तक्षेप करणे गैर आहे. त महीला पदाधिकार्यांनी आपल्या कामातील पुरूषांचा हस्तक्षेप न थांबविल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) अन्वये अपात्र देखील ठरू शकतात. त्यामुळे महिला पदाधिकार्यानी आपल्या कामकाजातील पुरूषांचा अवास्तव हस्तक्षेप भविष्यात थांबवावा - ॲड. विरेंद्र झाडोकार, खामगाव.