अंजनी खुर्द येथे सरपंचपदाची निवडणूक होणार अटीतटीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:40+5:302021-02-06T05:04:40+5:30
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून, यामध्ये सहा महिला सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंचपद ...
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून, यामध्ये सहा महिला सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, सरपंचपदाची निवडणूक ही १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक निकाल लागल्यापासूनच सर्व पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य आपल्या गटाचा सरपंच व्हावा, म्हणून सर्व ताकदीने कामाला लागले आहेत. सदस्यांच्या सहली सुरू झाल्या आहेत. अंजनी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण जागेवर शीला अशोक खराटे, सिंधू प्रभाकर शेळके, गंगा कैलास गायकवाड या तीन महिला निवडून आल्या आहेत. या तीन महिला प्रमुख दावेदार असून, त्यांनी आपापल्या परीने सरपंच होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासोबतच उर्वरित तीन महिला सदस्यसुद्धा आपला सरपंचपदाचा दावा करू शकतात. त्यामध्ये जया अमोल अवसरमोल, शालिनी धोंडू मिसाळ, इंदू सुनील तनपुरे यांचा समावेश आहे. अंजनी खुर्द येथे दोन प्रमुख गट आपल्याच गटाचा सरपंच व्हावा, म्हणून सक्रिय झाले आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांची फोडाफोडी सुरू केली आहे. काही सदस्यांचे सध्या तळ्यातमळ्यात सुरू आहे.